
येरमाळा : धाराशिव जिल्ह्यातील सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग म्हणजे जिल्ह्यातील चालत्या वाहनातून चोऱ्या,चालत्या दुचाकी वरील चैन स्नॅपिंग करने,चारचाकी वाहने अडवून लूट केली जाणारा रस्ता म्हणुन राज्यात प्रसिद्ध झाला असुन यामुळे दक्षिण,उत्तर भारतातील अनेक राज्यांना सोयीचा जिल्ह्यातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग बदनाम झाल्याने जिल्ह्यातून होणाऱ्या वाहतुकीतील खाजगी वाहने,ट्रॅव्हल्स,मालवाहू वाहनांनी वाहतुकीचा मार्ग बदल्याने जिल्ह्याच्या दळणवळनासह हॉटेल व्यवसायिकांच्या लहान मोठ्या व्यवसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.जिल्हा पोलीस प्रशासनात नव्याने जिल्हा पोलीसअधीक्षक पदी रुजू झालेल्या रितु खोखर यांच्या पुढील हे आव्हान असुन जिल्ह्याच्या रस्ते वाहतूक विकासातून झालेल्या जिल्ह्याच्या वाहतूक सौंदर्याला वाहनलू्टीमुळे बदनामीचे ग्रहण लागले आहे जिल्ह्यात झालेला चौपदरी राष्ट्रीय महामार्ग वाहणानाच्या चोऱ्या,वाटमारीमुक्त महामार्ग करतील का याकडे जिल्ह्यातील वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.