हिंगोली : जिल्ह्यात कोविडचे नवीन 10 रुग्ण ; तर 14 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज, 103 रुग्णांवर उपचार सुरु

राजेश दारव्हेकर
Friday, 4 December 2020

गुरुवारी (ता. तीन) प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 04 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसरात 02 व्यक्ती, कळमनुरी परिसरात  04 व्यक्ती असे एकूण 10 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 14 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हिंगोली : जिल्ह्यात 10 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी दिली आहे.

गुरुवारी (ता. तीन) प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 04 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसरात 02 व्यक्ती, कळमनुरी परिसरात  04 व्यक्ती असे एकूण 10 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 14 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 03 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन सुरू आहे़, तर 01 कोविड-19 रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारे आज रोजी एकूण 04 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून सद्य:स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 393 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 238 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 103 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 52 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे

संपादन -प्रल्हाद कांबळे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: 10 new patients of Kovid and 14 patients were discharged in the district and treatment was started on 103 patients hingoli news

Tags
टॉपिकस
Topic Tags: