हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत १४१ अर्ज अवैध, १० हजार ४३ उमेदवार रिंगणात

file photo
file photo

हिंगोली : जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायतच्या निवडणुका होत असुन उमेदवार अर्ज छाननित गुरुवारी (ता. ३१) १४२ अर्ज अवैध ठरले आहेत. आता १० हजार ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी  जिल्ह्यातील पाच तालुक्यात १० हजार १८४ अर्ज दाखल झाले होते. गुरुवारी छाननित १४१ अर्ज अवैध ठरल्याने आता १० हजार ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

हिंगोली तालुक्यात ३६ अर्ज अवैध ठरले आहेत तर निवडणूक रिंगणात आता १८५७ उमेदवार आहेत. वसमत तालुक्यात ४१ अर्ज अवैध असुन २३५० उमेदवार रिंगणात आहेत. कळमनुरीत २९ अर्ज अवैध आहेत तर निवडणूक रिंगणात २०८६ उमेदवार आहेत. औंढा तालुक्यात १३ अर्ज अवैध आहेत १७२६ उमेदवार रिंगणात आहेत तर सेनगाव तालुक्यात २२ अर्ज अवैध ठरले असुन २०२४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

रम्यान घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप घेण्याच्या कारणावरून वातावरण तापल्याचे चित्र होते. छाननी प्रक्रियेमध्ये स्वच्छता ग्रह वापरात नसल्याबाबत, तिसरे अपत्य, मतदार यादी मधील नावाच्या चुकी बाबत, जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडले नसल्याबाबत, व मागील निवडणुकीत निवडणूक लढवून खर्च सादर न केलेल्या उमेदवाराच्या बाबतीत प्रतिस्पर्धी गटाकडून आक्षेप घेण्यात आले यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दाखल झालेल्या आक्षेपांची सुनावणी घेत अर्ज वैध किंवा अवैध ठरविण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com