हिंगोली : २२ लाखचे गांजाची झाडे जप्त- एसपाी कलासागर यांची धाडशी कारवाई

राजेश दारव्हेकर
Wednesday, 18 November 2020

उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली संबधितावर कारवाई करत  २१ लाख ८६ हजार २०० रुपये किमंतीची ३४५ गांजाची झाडे बुधवार ता. १८ जप्त करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

हिंगोली : वसमत तालुक्यातील हापसापुर येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये गांजाचे उत्पादन घेत असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना समजली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली संबधितावर कारवाई करत २१ लाख ८६ हजार २०० रुपये किमंतीची ३४५ गांजाची झाडे बुधवार (ता. १८) जप्त करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वसमत तालुक्यातील हाफसापूर येथे नामदेव सवंडकरने या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या शेतात गांजाची लावगड केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना कळताच पोलिस अधीक्षक श्री कलासागर, उपविभागीय पोलिस अधिकारी यतिन देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. गोपीनवार यांच्या पथकाने  माहितीच्या आधारावर सवंडकर यांच्या शेतावर कारवाई केली. यावेळी ऊसाच्या शेतात गांजाची लावगड केल्याची माहिती  समोर आली. यामध्ये २१ लाख ८७ हजार २०० रुपये किंमतीचे ३४५ गांजाची झाडे जप्त करण्यात आली.

सवंडकर या ऊस उत्पादक शेतकऱ्यांने गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला समजली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली संबधितावर कारवाई करत ३४५ गांजाची झाडे जप्त केली. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.जिल्ह्यातील यापूर्वी  सेनगाव, कळमनुरी आणि आता वसमत या भागात बऱ्याच शेतात गांजाची झाडे पोलिसांच्या कारवाईत आढळून आली आहेत.

हेही वाचामुदखेडचे पोलिस निरीक्षक निकाळजे यांनी अनाथाश्रमातील बालकांसोबत केली दिवाळी साजरी -

दरम्यान, हापसापुर  परिसरातील शेतशिवार पोलिसांच्या पथकाने  पिंजून काढला आहे. ऊसाच्या शेतातून गांजाची झाडे जप्त केल्यानंतर अजूनही या भागात शेतकरी गांजाची शेती करत आहेत का याची चाचपणी  कैली जात आहे.

सवंडकर यांनी आतापर्यंत अंतर पीक म्हणून अद्रक, मेथी, कोथंबीर आदी भाजीपाला घेतला जात होता. मात्र, याच शेतकऱ्याला गांजाचे पीक अंतर पीक म्हणून घेण्याची कल्पना नेमकी सुचली कशी, तसेच या पूर्वी ही हा गांजा घेत होता का, तसेच गांजा नेमका विक्री कुठे करत होता. याची संपुर्ण माहिती घेतली जात आहे.  

दरम्यान या पथकात शेषराव लाखाडे, शेख नसर, इमरान कादरी, महेश अवचार, अरविंद गजभार, राजाराम कदम, विशाल काळे, सुरज शिंदे यांचा समावेश होतो. या पथकाचे पोलीस प्रशासनाने अभिनंदन केले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: 22 lakh cannabis plants seized SP Kalasagar's bold action hingoli news