esakal | हिंगोली : तीन कोटीच्या निधीतून २२ नवीन अंगणवाड्याचे बांधकाम होणार- डेप्युटी सीईओ गणेश वाघ 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने नवीन अंगणवाड्याच्या बांधकाम व दुरुस्ती साठी जिल्हा नियोजन विभागाकडे पाच कोटीची मागणी केली होती.

हिंगोली : तीन कोटीच्या निधीतून २२ नवीन अंगणवाड्याचे बांधकाम होणार- डेप्युटी सीईओ गणेश वाघ 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात २२ नवीन अंगणवाड्याच्या इमारतीचे बांधकाम व २६३ अंगणवाड्याच्या दुरुस्तीसाठी नियोजन विभागाने तीन कोटीचा निधी बांधकाम विभागाकडे वर्ग केल्याने आता अंगणवाड्याचे बांधकाम केले जाणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने नवीन अंगणवाड्याच्या बांधकाम व दुरुस्ती साठी जिल्हा नियोजन विभागाकडे पाच कोटीची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन विभागाच्या बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अंगणवाड्या बांधकामासाठी तीन कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे सांगितले होते. त्यानुसार नियोजन विभागाने तीन कोटीचा निधी मंजूर केला असून बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. अंगणवाड्या बांधकाम व दुरुस्तीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून तांत्रिक मान्यता व ई- निविदा प्रक्रिया बांधकाम लवकरच करणार आहे.

हेही वाचाMotivational Story:जिद्दीने गाठले यशाचे शिखर; नांदेडच्या शेतकऱ्याची मुलगी निमलष्करी दलात

या तीन कोटी निधीतून सेनगाव येथे नवीन चार अंगणवाड्या, हिंगोली येथे पाच, वसमत येथे पाच तर कळमनुरी येथे आठ असे मिळून २२ नवीन इमारतीचे बांधकाम केले जाणार असून २६३ जुन्या अंगणवाड्याची दुरुस्ती केली जाणार आहे. बांधकाम विभागाकडून तांत्रिक मान्यता मिळताच ई- निविदा प्रक्रिया केल्यानंतर अंगणवाड्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

जिल्ह्यात एक हजार ८९ अंगणवाड्या असून शुन्य ते सहा वर्षातील एक लाख बालके पूर्व प्राथमिक शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यातील काही अंगणवाड्या या ग्रामपंचायत मध्ये भरविल्या जातात तर काही अर्बन भागातील अंगणवाड्या या किरायाच्या खोलीत भरविल्या जातात. त्यामुळे अंगणवाड्याना ग्रामीण भागात जागा उपलब्ध झाली होती मात्र निधी अभावी कामे खोळंबली होती. आता निधीचा प्रश्न मार्गी लागल्याने २२ नवीन अंगणवाड्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्ह्यातील अंगणवाड्याना एकसारखी रंगरंगोटी केल्याने अंगणवाड्या आकर्षक दिसत असून ,राज्यात हिंगोली पॅटर्न अव्वल ठरणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image