esakal | हिंगोलीत राजस्‍थानकडे जाणारे २६३ कामगार सीमाबंदीमुळे अडकले
sakal

बोलून बातमी शोधा

corona

लॉकडाउनमुळे रेल्वे, बस बंद केल्याने जिल्ह्यातील बाहेर राज्यातील कामगार, नोकरदार, विद्यार्थी वाहनाअभावी अडकून पडले तर काही राजस्थान येथील कामगार हैदराबाद येथे अडकून पडले होते. कंपन्यादेखील बंद असल्याने काय खावे, असा प्रश्न त्यांना पडला होता. वाहनेही उपलब्ध नसल्याने २६३ कामगार कुटुंबांनी चक्क पायी जाण्याचा विचार केला अन् ते हिंगोली येथे (ता.२७) मार्चला दाखल होताच या सर्व कामगारांना चेकपोस्‍टवर तैनात असलेल्या पथकाने पकडून हिंगोली येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे ठेवले. 

हिंगोलीत राजस्‍थानकडे जाणारे २६३ कामगार सीमाबंदीमुळे अडकले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन सुरू झाल्याने हैदराबाद येथून हिंगोलीमार्गे राजस्थानकडे निघालेल्या २६३ कामगारांना येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ठेवण्यात आले आहे. यापैकी काहींना कळमनुरीत, तर काहींना समाजकल्याण येथील वसतिगृहात ठेवले असून आतापर्यंत दहा जण घरी परतले आहेत.

राजस्थान येथील काही कामगार लॉकडाउनमुळे हैदराबाद येथे अडकून पडले होते. यात २६३ कामगार कुटुंबांनी चक्क पायी जाण्याचा विचार केला अन् ते हिंगोली येथे (ता. २७) मार्चला दाखल होताच या सर्व कामगारांना चेकपोस्‍टवर तैनात असलेल्या पथकाने पकडून हिंगोली येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ठेवले. त्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी खुद्द या लोकांची विचारपूस करून त्यांची जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेश पथकाला दिले. याला आज जवळपास वीस दिवस झाले. 

हेही वाचा - Video : आधी फवारणी, मगच मिळणार इंधन

जिल्हा प्रशासनाने घेतली काळजी 
या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मात्र, कोरोनाशी साम्य असलेली लक्षणे आढळून आली नाहीत. या सर्वांना इंस्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये ठेवले आहे. यातील काहींना लिंबाळा येथील समाज कल्याण वसतिगृहात ठेवले, तर काहींना गर्दी होऊ नये म्हणून कळमनुरी येथील तयार केलेल्या आयसोलेशन कक्षात ठेवले आहे. यातील दहा जण घरी परतल्याचे सांगितले आहे. आता तंत्रनिकेतन येथे ६५ ते ७० कुटुंब असून त्यांची जिल्हा प्रशासनाच्या वतीने काळजी घेतली जात आहे.

हेही वाचा - संचारबंदी शिथील होताच उसळली गर्दी

परत जाऊ द्या म्हणून उपोषण... 
काही दिवसांपूर्वी या कामगारांनी आम्हाला आमच्या गावाला परत जाऊ द्या म्हणून उपोषण सुरू केले होते. परंतु, जिल्हाधिकारी जयवंशी यांनी आम्ही तुमचे मोठे भाऊ आहोत, अशी समजूत काढून लॉकडाउन संपेपर्यंत सोडता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी राहण्याचे आवाहन केले. तुम्हाला काही कमी पडू देणार नसल्याचे अश्वासन दिल्याने त्यांनी उपोषण मागे घेत जेवण करू लागले आहेत.

२२ हजारांपेक्षा अधिक नागरिक दाखल
आजपर्यंत २२ हजारांपेक्षा अधिक नागरिक दाखल
पुणे, मुंबई, मालेगाव अशा विविध ठिकाणांहून आजपर्यंत २२ हजारांपेक्षा अधिक नागरिक हिंगोलीत दाखल झाले असून त्यांची आरोग्य पथकामार्फत घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली.