esakal | हिंगोली : जिल्ह्यात ४२२ ग्रामपंचायतीमध्ये प्रस्थापितांना धक्का देत नवख्या कारभाऱ्यांच्या हाती गावगाडा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

प्रस्थापिताना धक्का देतकाही गावातील गावकऱ्यांनी नवख्याना तर काही ठिकाणी जुन्यानाच गावचे कारभारी करत हाती सत्ता दिली आहे.

हिंगोली : जिल्ह्यात ४२२ ग्रामपंचायतीमध्ये प्रस्थापितांना धक्का देत नवख्या कारभाऱ्यांच्या हाती गावगाडा

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यातील सोमवारी (ता. १८) ४२२ ग्रामपंचायतीचे निकाल घोषित झाले आहेत. यात प्रस्थापिताना धक्का देतकाही गावातील गावकऱ्यांनी नवख्याना तर काही ठिकाणी जुन्यानाच गावचे कारभारी करत हाती सत्ता दिली आहे.

जिल्ह्यात ४९५ पैकी ७३ ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्याने ४२२  ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. या ग्रामपंचायतीची मतमोजणी सोमवारी सकाळी दहा वाजता जिल्ह्यातील पाच  तालुक्याच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्तात झाली.

हेही वाचाग्रामपंचायत निकाल : आखाडा बाळापूर काँग्रेस; तर साळवा ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात

हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणी येथे स्विडन येथून गावात आलेल्या डॉ. चित्रा अनिल कर्हे या दाम्पत्याने राजकारण उतरत विजय मिळविला आहे. सेनगाव तालुक्यातील गोरेगावात दोन्ही माजी आमदार एकत्र येत विजय संपादन केला. यात माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर व माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा समावेश आहे. 

औंढा तालुक्यातील जवळा बाजार ग्रामपंचायत मध्ये महाविकास आघाडी पँनलने वंचित आघाडीचे मुनीर पाटील यांच्या पँनलवर मात करीत विजय मिळविला वसमत तालुक्यातील कुरुंदा ग्रामपंचायत मध्ये बाजार समितीचे सभापती राजेश पाटील इंगोले यांनी एकहाती सत्ता स्थापन केली आहे. तर कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापुर येथे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संजय बोंढारे यांच्या पँनलने परत सत्ता स्थापन केली आहे. याच तालुक्यात शेवाळा येथे पंचायत समितीचे माजी सभापती गोपु पाटील यांच्या पँनलचा पराभव करत काँग्रेसचे माजी सरपंच अभय सावंत यांनी सत्ता परत मिळविली आहे. तर डोंगरकडा येथे जिल्हा परिषद सदस्य दिलीप देसाई यांना धक्का देतशिवाजी गावंडे यांच्या पँनलचा विजय झाला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image