

Hingoli Aaple Sarkar Selection; Deadline Extention
esakal
हिंगोली: हिंगोली जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्राच्या निवडीवर उमेदवारांनी तक्रारी करताच जिल्हा प्रशासन बॅकफुटवर आले असून, याबाबत दखल घेत आता या निवडीवर १३ मार्चपर्यंत आक्षेप सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कागदपत्रांची चौकशी होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.