esakal | हिंगोली : दोन मांडूळ प्रजातीचे साप बाळगणाऱ्यांना जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची  कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मांडूळ प्रजातीचे जीवंत साप बाळगुन तिची चोरटी तस्करी, विकी करण्यासाठी बाळगुन आहेत

हिंगोली : दोन मांडूळ प्रजातीचे साप बाळगणाऱ्यांना जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची  कारवाई

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना  मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जिल्ह्यातील देउळगाव जहागीर व सरकळी या गावात मांडूळ प्रजातीचे जीवंत साप बाळगून चोरटी तस्करी करणाच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या दोघांवर मंगळवारी (ता. १९) कार्यवाही करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतीश कांबळे व दत्तराव साठे हे मांडूळ प्रजातीचे जीवंत साप बाळगुन तिची चोरटी तस्करी, विकी करण्यासाठी बाळगुन आहेत अशा खात्रीशीर माहितीवरून हिंगोलीचे सर्प मित्र विश्वंबर पटवेकर यांना सोबत घेउन  देउळगांव ( जहांगीर ) येथे जाउन सतिश  कांबळे याचे रहाते घरातून एका पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टीक झाकण असलेल्या बकेटमधे असलेला एक काळसर चॉकलेटी रंगाचा मांडूळ प्रजातीचा जीवंत साप काळया मातीत असलेला वजन अंदाजे दोन कि.ग्रॅम व लांबी अंदाजे दोन ते अडीच फुट किमती अंदाजे १० लाख रूपये . किमतीचा मिळून आला.

हेही वाचाBreaking : डुकरांनी ताेडले मृतदेहाचे लचके; नांदेडकरांचा जिल्हा रुग्णालयावर राेष

तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी हे परत नर्सी नामदेव येथे  येत असतांना गुप्त  माहितीनुसार सरकळी ता.हिंगोली येथील दत्तराव साठे याने सुध्दा एक जीवंत मांडूळ प्रजातीचा साप बाळगून आहे. अशा खात्रीशीर माहितीवरून त्याचे घरात एका पांढऱ्या रंगाचे झाकन असलेल्या बकेट मध्ये काळया बारीक मातीत ठेवलेला काळसर मांडूळ प्रजातीचा साप वजन अंदाजे एक कि.ग्रॅम व लांबी अंदाजे तीन फुट किंमती अंदाजे पाच लाख रूपये असे काढून दिले. सदर दोन्ही इसमांनी आपापले रहाते घरात वाइल्ड लाइफ वॉर्डन यांच्या परवानगीशीवाय माडूळ प्रजातीचे दोन साप अंदाजे किमत १५ लाख रूपये किमतीचे चोरटी विक्री, तस्करी करण्याचे उद्देशाने बाळगुन असतांना मिळून आले म्हणून त्यांच्याविरूध्द योग्य ती कायदेशीर कार्यवाही होण्यासाठी विभागीय वनअधिकारी यांचे ताब्यात दोन्ही इसम व दोन दुर्मीळ मांडूळ प्रजातीचे सापासह देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोर पोटे, शिवसांब घेवारे तसेच बालासाहेब बोके, शंकर जाधव, विलास सोनवणे, राजुसिंह ठाकुर, शंकर ठोंबरे, आकाश टापरे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे