esakal | हिंगोलीत नव्याने आठ कोरोना रुग्णांची भर, एकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आज सापडलेल्या रुग्णांत हिंगोली येथील नाईकनगर येथील ५९ वर्षीय महिला, वंजारवाडा एक वर्षाचा मुलगा, तलाबकट्टा येथील ३५ वर्षाची महिला आझम कॉलनी ५६ वर्षाचा पुरुष रिसाला बाजार एक पुरुष, एसआरपीएफ कॅम्पमधील ३१ वर्ष जवानाचा समावेश आहे

हिंगोलीत नव्याने आठ कोरोना रुग्णांची भर, एकाचा मृत्यू

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : बुधवारी (ता. २९) रोजी हिंगोली जिल्ह्यामध्ये नव्याने एकूण आठ कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत . त्यातील एक रुग्ण अॅन्टीजन तपासणीत पॉझिटिव्ह आला आहे व एक कोरोना रुग्णाचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. आज सापडलेल्या रुग्णांत हिंगोली येथील नाईकनगर येथील ५९ वर्षीय महिला, वंजारवाडा एक वर्षाचा मुलगा, तलाबकट्टा येथील ३५ वर्षाची महिला आझम कॉलनी ५६ वर्षाचा पुरुष रिसाला बाजार एक पुरुष, एसआरपीएफ कॅम्पमधील ३१ वर्ष जवानाचा समावेश आहे.

हिवरा ता. कळमनुरी येथील ४४ वर्षीय पुरुष, वसमत तालुक्यातील शिवपुरी येथील ३६ वर्ष महिलेचा समावेश आहे.  दरम्यान, हिंगोली येथील कासारवाडा, ५० वर्षीय पुरुषाचा कोरोनाच्या आजाराने मृत्यू झाला आहे. 

येथील आहेत बाधीत रुग्ण

बुधवारी ३६ कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज करण्यात आले आहे. आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे ( ८ कोरोना रुग्ण ) आहेत यात एक पेडगाव, एक नवलगव्हाण, एक आझम कॉलनी, एक अंजनवाडी, एक नवा मोंढा, एक अशोकनगर वसमत, एक सेनगाव, एक रिसाला बाजार कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे ( १४ कोरोना रुग्ण ) सहा भाजीमंडी कळमनुरी, दोन कांडली, एक रेडगाव, पाच जिल्हा परिषद हिंगोली, कोरोना केअर सेंटर लिंबाळा येथे ( १२ ) पाच तलाबकट्टा, सात खडकपूरा हिंगोली तर कोरोना केअर सेंटर वसमत ( दोन कोरोना रुग्ण ) दोन अशोकनगर येथील आहेत.

हेही वाचा -  नांदेडला थोडा दिलासा : बुधवारी ४० रुग्णांची भर, चौघांचा मृत्यू, संख्या पोहचली १५६८ वर

४२१ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला

हिंगोली जिल्ह्यात आठ नवीन कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत. ३६ कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ५९३ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ४२१ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज घडीला एकूण १६५ रुग्णांवर उपचार चालु आहेत. आणि सात कोरोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

त्यापैकी ६४८२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत

जिल्ह्यातंर्गत आयसोलेशन वार्ड, सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंटाईन सेंटर अंतर्गत एकूण ७२७० व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी ६४८२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ६७१२ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीला ५३८ व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी २२३ अहवाल येणे प्रलंबित आहे. आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुणालय हिंगोली येथे भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी १८ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सीजन चालु आहे, एका २८ वर्ष कोरोना रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्याला बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.