esakal | हिंगोली : समुपदेशन पद्धतीने देणार शिक्षकांना पदस्थापना
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष  सुभाष जिरवणकर यांनी शिक्षण व अर्थ सभापती रत्नमाला चव्हाण मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, शिक्षणाधिकारी संदिप सोनटक्के यांची भेट घेऊन या शिक्षकांना लवकरात लवकर पदस्थापना देण्यासाठी निवेदन देण्यात आले होते

हिंगोली : समुपदेशन पद्धतीने देणार शिक्षकांना पदस्थापना

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली :  अंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना सोमवारी ( ता. २६) समुपदेशन पद्धतीने पदस्थापणा दिली जाणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेकडे शिक्षकांची होणारी पायपीट थांबणार आहे.

जिल्हा परिषदे अंतर्गत आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना शाळेवर पदस्थापना देण्यासाठी सतत विलंब होत असल्याने शिक्षकांमध्ये असंतोष पसरला होता. सतत हे शिक्षक जिल्हा परिषदेकडे पायपिट करून शाळेवर लवकरात लवकर पदस्थापना देण्यात यावी म्हणून गेल्या एक महिन्यापासुन पाठपुरावा करत होते, परंतु शिक्षण विभागाकडुन प्रतिसाद मिळत नसल्याने आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा निमंत्रित सदस्य सुभाष जिरवणकर यांनी पदस्थापना देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा यासाठी निवेदन दिले होते.

हेही वाचा -  नांदेड : महावितरणच्या कामात अडथळा, सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल -

शाळेवर पदस्थापना देण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी शिक्षण व अर्थ सभापती रत्नमाला चव्हाण, मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, शिक्षणाधिकारी संदिप सोनटक्के यांची भेट घेऊन या शिक्षकांना लवकरात लवकर पदस्थापना देण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल प्रशासनाने घेऊन आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना सोमवारी (ता. २६) पदस्थापना देण्यात येईल असे लेखी पत्र काढून शिक्षकांना कळविले आहे. शाळेवर पदस्थापना देण्यासाठी  प्रशासनाने निर्णय घेतला आहे व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने यासाठी पाठपुरावा केल्याबदल या शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे .

शिक्षक संघाच्या वतीने स्वागत करण्यात

आता या शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने शासन निर्णय प्रमाणे शाळेवर पदस्थापना देण्यात येणार आहे. यामध्ये महिला शिक्षिका, स्तनदा माता, गरोदर शिक्षिका, अपंग, विधवा, परितक्त्या पती- पत्नी एकत्रीकरण याच बरोबरोबर शासनाच्या निर्णयाप्रमाणे पदस्थापना देण्यात येणार असल्याने प्रशासनाकडून संबंधित शिक्षकांना लेखी पत्राद्वारे सुचना काढून कळविले आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image
go to top