esakal | हिंगोली : नवरात्रोत्सव जवळ आल्याने दूर्गा मुर्ती तयार करण्याचे काम अंतीम टप्प्यात
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

वाढत्या महागाईचा फटका मूर्तीनाही बसला असून गतवर्षपिक्षा मूर्तीच्या किमतीत दीडपट वाढ झाली आहे .

हिंगोली : नवरात्रोत्सव जवळ आल्याने दूर्गा मुर्ती तयार करण्याचे काम अंतीम टप्प्यात

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली शहरात दसर्याबरोबर दुर्गा महोत्सवाची जोड असते गल्लोगल्ली देवीच्या मूर्तीची स्थापना केली जात. यावर्षी कोरोना संकटामुळे सार्वजनिक कार्यक्रमास बंधने आली आहेत. मात्र ती सांभाळत मुर्तीकार मुर्ती करण्यात मग्न झाले आहेत.

वाढत्या महागाईचा फटका मूर्तीनाही बसला असून गतवर्षपिक्षा मूर्तीच्या किमतीत दीडपट वाढ झाली आहे. गवळीपुऱ्यातील कारागीर गणेशोत्सव, महालक्ष्मी, दुर्गा महोत्सव, दीपावलीत लागणाऱ्या पणत्यांसह प्लास्टर ऑफ पॅरिसच्या देवीच्या मूर्ती तयार करतात. अनेक कुटुंबीयांचा हाच उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे. गणेशोत्सव संपताच मूर्तिकार दुर्गादेवीच्या मूर्ती तयार करण्यास सुरवात करतात. पंचवीस ते तीस कारागीर व त्यांचे कुटुंबीय या कामात व्यस्त आहेत. 

हेही वाचानांदेड : भुमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यानी लाटला लाखोंचा मलिदा, शेतकऱ्याची तक्रार

कोरोना संकटामुळे अनेक बंधने आली आहेत

शहरासह अनेक ठिकाणांवरून मूर्तीच्या ऑर्डर मिळतात. ज्ञानेश्वर पेरियार यांचा वडिलोपार्जित मूर्ती तयार करण्याचा पन्नास वर्षांपासूनचा व्यवसाय आहे. वडिलांकडून मूर्ती तयार करण्याचे त्यांनी गिरविले. नवरात्र महोत्सवासाठी दुर्गा मूर्ती तयार करीत आहेत. यावर्षी कोरोना संकटामुळे अनेक बंधने आली आहेत. देवीच्या मुर्तीची उंची चार फुट ठेवण्याचे बंधन आहे. दरवर्षी बारा ते पंधरा फुट उंच मूर्ती तयार केल्या जातात त्यांना मागणी देखील असते आँर्डर देखील येतात. 

राजस्थान येथून प्लास्टर ऑफ पॅरिस मागविले

यावर्षी मात्र मंडळासाठी नियमावली आल्याने देवीच्या मुर्तीची आँर्डरचे प्रमाण घटले आहे. मात्र मिळालेल्या आँर्डर व ऐनवेळी होणारी खरेदी यामुळे चार फुट उंचीच्या देवीच्या मुर्ती तयार केल्या आहेत. मूर्ती तयार करण्यासाठी राजस्थान येथून प्लास्टर ऑफ पॅरिस मागविले आहे  असल्याचे त्यांनी सांगितले. गतवर्षी दीडशे रुपयांना मिळणारी प्लास्टर

मूर्तीची भाववाढ अपरिहार्य

परिणाम पॅरिसची पंधरा किलोंची बॅग यावर्षी दोनशे रुपयांपर्यंत मिळते. पूर्वी एक हजार रुपयांना मिळणारी दहा किलो रंगाची बकेट आता बाराशे, चौदाशे रुपयांपर्यंत मिळते. त्यामुळे मूर्तीची भाववाढ अपरिहार्य आहे. अडीच हजारांपासून, सहा हजारांपर्यत मूर्तीचे भाव असून, ऑर्डरप्रमाणे मूर्ती तयार केल्या आहेत यात अष्टभुजा, दुगदिवी, तुळजाभवानी, रेणुकामाता, चंडिका, अंबिका, सप्तशृंगी आदी नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवीच्या मूर्तीचा समावेश आहे. गणेशोत्सवात यावर्षी नुकसान झाले आहे. देवीच्या मुर्ती मध्ये भरुन निघेल अशी अपेक्षा मुर्तीकार व्यक्त करीत आहेत. 

येथे क्लिक कराहिंगोली : अनुकंपाधारक ७० उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची होणार तपासणी

कोरोनाच्या संकटामुळे व्यवसायावर परिणाम

अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करतो . मात्र शासनाकडून कुठलेच अनुदान मिळत नाही. हा व्यवयास वाढीस लागावा म्हणून कर्जासाठी मागणी करूनही त्याचा उपयोग झाला नाही. शासनाने कारागिरांना कर्ज उपलब्ध करून दिल्यास आधार मिळेल . यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. शासनाकडून मदत मिळाल्यास त्याचा आधार मिळणार आहे.

- ज्ञानेश्वर पेरीयार, मुर्तीकार, हिंगोली.

संपादन - प्रल्हाद कांबळे