
हिंगोली : लग्नाचे आमिष दाखवून 'विद्यार्थिनीवर' अत्याचार
हिंगोली : शहरातील एका वसतीगृहातून बेपत्ता झालेल्या विद्यार्थिनीचा शोध लागला असून तिला तिच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले आणि अत्याचार केला. असा जबाबच या मुलीने दिला आहे. या बाबत शनिवारी हिंगोली शहर पोलिसांकडे तिने जबाब नोंदवला. तिने दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी तरूणाविरुद्ध अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश धनवे रा. वाळकी असे तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरातील एका वसतीगृहातील विद्यार्थिनी बीए तृतीय वर्षात शिक्षण घेते.
बुधवारी सकाळी महाविद्यालयात जात असल्याचे सांगून ती वसतीगृहातून निघाली. याबाबत तिने वसतीगृहाच्या रजिस्टरमध्ये नोंद केली होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत ती परत आली नाही. त्यामुळे वसतीगृहाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात हिंगोली शहर पोलिस ठाण्यात अर्ज दिला होता. त्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश कलासागर सहायक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, जमादार एम.एम. टाले यांच्या पथकाने तिचा शोध सुरू केला होता.
Web Title: Hingoli Atroction On Female Students Showing Marriage Promiss Charges Filed Against Accused
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..