
हिंगोलीत भाजप ओबीसी मोर्चाचे ठिय्या आंदोलन
हिंगोली : येथे ओबीसी चे राजकीय आरक्षणा संदर्भात आघाडी सरकारचा निषेध करत भाजपा युवा मोर्चा तर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या नाकर्ते पणा मुळे राजकीय आरक्षण रद्द करुण ओबीसी समाजावर अन्याय केला आहे. एकीकड़े भाजपा राज्य मध्यप्रदेश येथे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण देण्यात आले असुन महाराष्ट्र राज्यात मात्र याकड़े दुर्लक्ष केले जात आहे यांचा निषेध करत सोमवार सकाळी अकरा वाजता ज़िल्हा अधिकारी कार्यालया जवळ ज़िल्हा एक दिवसीय आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सचिव रजनी पाटील, बबनराव गीते, जिल्हा सघंटन सचिव फुलाजी शिंदे, मिलिंद यंबल, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, तसेच पांडुरंग पाटील, के. के. शिंदे, संतोष टेक़ाळे, प्रशांत सोनी, हमिद प्यारेवाले, ओबीसीचे जिल्हाध्यक्ष बालासाहेब नाईक सरचिटणिस संदिप वाकडे, बाबा घुगे, शाम खंडेलवाल, शंकर बोरुडे, अमोल जाधव, लखन गोरे, महेश शहाणे, दारासिंग राजपूत , बाळासाहेब उपाळे आत्माराम राठोड, पिंटू सोनटक्क, प्रवीण जैन, तुकाराम मस्के, कैलास खर्जुले,शंकर मुधोळकर, उज्ज्वला खोलगाडगे विठ्ठल बांगर आदीची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात निवेदन देण्यात आले.
Web Title: Hingoli Bjp Agitation Obc For Reservation In Front Of Collectorate
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..