esakal | हिंगोली ब्रेकींग: कतार राष्ट्रातून परतलेल्या तरुणासह चौघे पॉझिटिव्ह, संख्या पोहचली ३३ वर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बुधवारी (ता. १७) रात्री उशिरा आढळले. त्यामुळे हिंगोलीत रुग्ण संख्या वाढली असून ती आता ३३ वर पोहचली आहे. अशी माहिती जिल्हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. 

हिंगोली ब्रेकींग: कतार राष्ट्रातून परतलेल्या तरुणासह चौघे पॉझिटिव्ह, संख्या पोहचली ३३ वर

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : कतार राष्ट्रातून जिल्ह्यातील औंढा तालुक्यात तसेच दिल्ली येथून कळमनुरी येथे परतलेल्या दोन युवकांसह क्वारंटाईन असलेल्या दोन राज्य राखीव बलाचे जवान कोरोना बाधीत बुधवारी (ता. १७) रात्री उशिरा आढळले. त्यामुळे हिंगोलीत रुग्ण संख्या वाढली असून ती आता ३३ वर पोहचली आहे. अशी माहिती जिल्हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. 

कतार देशातून औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथे परतलेल्या एका तरुणाला क्वारंटाइन सेंटर येथे भरती करून उपचार सुरु होते. आज त्याचा स्वॅब नमुना पॉझिटिव्ह आला आहे. तर दिल्लीवरून कळमनुरी तालुक्यातील टव्हा येथे परतलेल्या २७ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याने त्यावर उपचार सुरु केले आहेत. तसेच मुंबईवरून बंदोबस्त करून परतलेल्या ९२ जवानाना येलकी येथील एसएसएफच्या इमारतीत क्वारंटाइन केले होते. ९२ पैकी ८८ जवानांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले तर दोन जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दोघांचा अहवाल प्रलंबित आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात आठ कोविड रुग्णांना भरती करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. यामध्ये चोंढी पाच, तर सेनगाव तीन असे आठ रुग्णांचा समावेश आहे.

वसमतमध्ये तिन रुग्ण

आजपर्यत कोरोनाची लागण झालेले व उपचारासाठी कोरोना केअर सेंटर वसमतमध्ये तिन रुग्ण आहेत. यात एक कुरेशी मोहल्‍ला, एक अशोकनगर, एक मुरुम्बा येथील रहिवासी आहेत. ते उपचारासाठी भरती आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्‍थीर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. 

हेही वाचा - दिलासादायक - नांदेडला कोरोनाचा बुधवारी एकही नवीन बाधित नाही

कळमनुरी तालुक्यातही हाहाकार

कळमनुरी येथील कोरोना सेंटर येथे सहा कोरोना रुग्ण आहेत यात जाम येथील एक, दाती तीन, तर एक डोंगरकडा, टव्हा एक यांचा समावेश आहे. ते उपचारासाठी भरती असून त्‍यांची प्रकृती स्‍थीर आहे.  
डेडीकेट कोविड हेल्‍थ सेंटर कळमनुरी येथे एक कोरोनाचा रुग्ण असून तो एसआरपीएफ जवान आहे. जो उपचारासाठी भरती होता त्‍याला विशेष काळजी म्‍हणून औरंगाबाद येथील धूत हॉस्‍पीटलमध्ये भरती करण्यात आले आहे. 

जिल्‍ह्यात सर्वत्र कोरोनाचा संचार

जिल्‍हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात २० कोरोना रुग्ण आहेत. यात भगवती तीन, कलगाव सहा, सिरसम बुद्रुक एक, ब्राम्‍हणवाडा एक, सुकळी वळण एक, खानापूर एक, पेन्शनपुरा चार, भोईपुरा एक, कमलानगर एक, वसमत येथील सम्राटनगर येथील एकाचा समावेश आहे. ते उपचारासाठी भरती आहेत. त्‍यांची प्रकृती स्‍थीर आहे. त्‍यांच्यावर तज्ञ वैद्यकिय टिम मार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. 

सद्यस्‍थीतीत २७४ व्यक्‍ती भरती आहेत

जिल्‍ह्यात प्रत्‍येक तालुक्‍यातंर्गत तयार करण्यात आलेल्या क्‍वारंटाईन सेंटरमध्ये आजपर्यत ८४० व्यक्‍तीना भरती करण्यात आले आहे. ७९८ व्यक्‍तीचा स्‍वॅब अहलवाल निगेटीव्ह आला आहे. ५६६ व्यक्‍तींना डिस्‍चार्ज देण्यात आले आहेत. सद्यस्‍थीतीत २७४ व्यक्‍ती भरती आहेत. आज रोजी ४१ अहवाल येथे बाकी आहेत. आतापर्यत आयसोलेशन वार्ड व सर्व कोरोना सेंटरमध्ये एकूण २७५४ व्यक्‍तींना भरती करण्यात आले होते. त्‍यापैकी ३२८७ व्यक्‍तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ३००७ व्यक्‍तींना डिस्‍चार्ज दिला असून सद्यस्‍थीतीत ७२६ व्यक्‍ती भरती आहेत. तर २९१ अहवाल येणे प्रलंबीत आहेत. 

येथे क्लिक करापगारीसाठी २७० कोटींवर कर्मचाऱ्यांची नजर

२२५ अहवाल येणे प्रलंबीत

जिल्‍ह्यातंर्गत आयोसोलेशन वार्ड सर्व कोरोना सेंटर व गावपातळीवरील क्‍वारंटाईन सेंटर अंतर्गत ३६२३ व्यक्‍तीनी भरती भरती करण्यात आले आहे. त्‍यापैकी ३०७० व्यक्‍तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. २९१८ व्यक्‍तींना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. सध्या ६७६ व्यक्‍ती भरती आहेत. तर आज रोजी २२५ अहवाल येणे प्रलंबीत असल्याची माहिती डॉ. श्रीवास यांनी दिली.