esakal | हिंगोली ब्रेकिंग: आणखी मंगळवारी सात जणांना कोरोनाची लागण तर दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सेनगाव ,हिंगोली येथील कोरोना लागण झाल्याचा समावेश.

हिंगोली ब्रेकिंग: आणखी मंगळवारी सात जणांना कोरोनाची लागण तर दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात मंगळवारी (ता. २१) रात्री  साडेआठ वाजता प्राप्त अहवालानुसार एकाच दिवशी नव्याने सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली असून, यामध्ये एक जण अँटीजेन टेस्ट तपासणीद्वारे रुग्ण आढळून आला आहे. दोघांचा मृत्यू झाला असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

वसमत येथील ६७ वर्षीय पुरुष ,आझम कॉलनी येथील ३५ वर्षीय, मंगळवारा ५५ वर्षीय ,वसमत तालुक्यातील शिरली येथील ३५ वर्षीय पुरुष हा बेंगलोर येथून परतला आहे. या सर्वांना सारीचा आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर वसमत तालुक्यातील पळसगाव येथे २५ वर्षीय महिला अहमदनगर येथून गावी आली आहे. तर सेनगाव येथील ५८ वर्षीय पुरुष कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच तोफखाना येथील ६५ वर्षीय पुरुषाचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजघडीला एकूण ११४ रुग्णांवर उपचार सुरु 

कळमनुरी कोरोना केअर सेंटर अंतर्गत चार रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये नवी चिखली तीन, नांदापूर एक यांचा समावेश    आहे. जिल्ह्यात आतापर्यन्त ४४० रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ३२३ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला एकूण ११४ रुग्णांवर उपचार सुरु असून तीन कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. औंढा येथे अंजनवाडी येथील एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, वसमत अंतर्गत कोरोना केअर सेंटर येथे १७ रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये स्टेशन रोड तीन, सम्राटनगर पाच,  गणेशपेठ एक, पारडी  एक, गुलशननगर एक, बहिर्जीनगर एक, स्वानंदनगर एक, अशोकनगर दोन, शिरली एक यांचा समावेश आहे.

हेही वाचाकोरोना ब्रेकिंग : नांदेडने ओलांडला एक हजाराचा टप्पा, मंगळवारी ३२ बाधित, तर दोघांचा मृत्यू

जिल्हा सामान्य रुग्णालय 

आयसोलेशन वॉर्ड अंतर्गत ३५ रुग्णांना भरती करण्यात आले आहे. यामध्ये रिसाला एक, जीएमसी एक, धूत हॉस्पिटल एक, ब्राह्मण गल्ली वसमत एक, पेडगाव एक, शुक्रवारपेठ नऊ, नव्हलगव्हाण एक, तालाब कट्टा एक,  गवळीपुरा एक, पेन्शनपुरा एक, अंजनवाडी एक, सेनगाव तीन,
जयपूरवाडी एक ,नवा मोंढा  हिंगोली एक, कासारवाडा दोन, आझम कॉलनी तीन ,पलटण एक, नारायणनगर एक, अशोकनगर एक, श्रीनगर एक, मंगळवारा एक, वसमत पंचशीलनगर एक यांचा समावेश आहे. 

सर्वांची प्रकृती ठीक असून कोणतेही गंभीर लक्षणे नाहीत
 
वसमत येथील डेडीकेटेड केअर सेंटर येथे १७ रुग्ण भरती असून यात स्टेशन रोड तीन, सोमवारपेठ एक, सम्राटनगर पाच,  गणेशपेठ एक, पारडी एक, गुलशननगर एक, बहिर्जीनगर एक ,स्वानंद कॉलनी एक, अशोकनगर दोन यांचा समावेश आहे.
तसेच कळमनुरी येथे कोरोना सेंटरमध्ये एकूण १७ रुग्णावर उपचार सुरु असून, आखाडा बाळापूर तीन नांदेड संदर्भीत, कांडली दोन, रेडगाव एक,भाजी मंडई सहा, पाच जिल्हा परिषद हिंगोली यांचा समावेश आहे. याशिवाय लिंबाळा अंतर्गत कोरोना सेंटर येथे ३९ रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये पेडगाव चौदा, रामादेऊळगाव पाच, पहेनी दोन, माळधामणी एक, तालाब कट्टा दहा, खडकपुरा सात यांचा समावेश आहे. सेनगाव येथे बस स्टँड येथील एक, बालाजीनगर तीन, समतानगर एक जणांचा समावेश असून रुग्णावर उपचार सुरु आहेत. या सर्वांची प्रकृती ठीक असून कोणतेही गंभीर लक्षणे दिसून येत नसल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.

येथे क्लिक करानांदेड महापालिकेला नागरिक कृती समितीच्या काय आहेत सुचना...? वाचा...

५६५९ व्यक्तींना घरी सुट्टी देण्यात आली आहे

जिल्ह्यात गावपातळीवर तसेच क्वारं टाइन सेंटर अंतर्गत ६५४४ व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ५८२५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ५६५९ व्यक्तींना घरी सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला ८५७ रुग्ण भरती असून, ३३१ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णांपैकी सात रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. तर दोन रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असून नऊ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे