
याबाबत माहिती अशी की, वारंगाफाटा ही मोठी बाजारपेठ आहे. तसेच हिंगोली ते नांदेड व विदर्भाकडे जाणारा देखील मार्ग आहे. येथे छोट्या मोठ्या चोरीच्या घटना नेहमीच घडतात. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास येथील बाजारपेठेत अज्ञात चोरट्यांनी सलग पाच दुकानांचे सात शटर वाकून चोरी करुन दोन दुकानातील रोख ९३ हजार व एक लँपटाँप लाबंविला आहे.
वारंगा फाटा (जिल्हा हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथे अज्ञात चोरट्यांनी पाच दुकानांचे शटर वाकवून ९३ हजार रोख व एक लँपटाँप पळवून नेल्याची घटना गुरुवारी (ता.दहा) भल्या पहाटे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, वारंगाफाटा ही मोठी बाजारपेठ आहे. तसेच हिंगोली ते नांदेड व विदर्भाकडे जाणारा देखील मार्ग आहे. येथे छोट्या मोठ्या चोरीच्या घटना नेहमीच घडतात. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास येथील बाजारपेठेत अज्ञात चोरट्यांनी सलग पाच दुकानांचे शटर वाकवून चोरी करुन दोन दुकानातील रोख ९३ हजार व एक लँपटाँप लाबंविला आहे. यात वैष्णवी एजन्सी येथून ९३ हजार नगदी व एक लँपटाँप तर हायटेक अँग्रो एजन्सी येथील तीन हजार रुपये रोख लांबविले आहेत.
हेही वाचा - लॉकडाऊनने आली नागरिकांमध्ये ‘ड’ जीवनसत्वाची कमी -
तर हायटेक अग्रो सेंटर, गोविंद ट्रेडिंग कंपनी, अंचल किराणा व एका डेअरी सेंटरचे शटर वाकविले आहे. या ठिकाणी मात्र चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, वारंगा फाटा बीट हवालदार शेख बाबर यांच्यासह पोलीस दाखल झालेले आहेत. ठसे तज्ञांना देखील पाचारण करण्यात आले आहे. पुढील तपासकार्य सुरू आहे. याबाबत पोलीस ठाण्यात कोणताही नोंद झाली नव्हती. एकाच रात्री राष्ट्रीय महामार्ग लगत एवढ्या मोठ्या प्रमाणात शटर वाकून धाडसी चोरी केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. येथे रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे