
सेनगाव तालुक्यातील कवरदडी येथील सावकारी करणाऱ्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी शेत जमीन ताब्यात घेतल्यामुळे संबंधित सावकाराचे कुटुंब वाद असलेल्या या शेतामध्ये काम करत होते.
सेनगाव (जिल्हा हिंगोली) : तालुक्यातील कवरदडी येथील ग्रामस्थांकडून कारवाईच्या दरम्यान फिर्यादी, साक्षीदार आणि पोलिसांना धमकावून दमदाटी केल्यामुळे शंभर जणांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सेनगाव पोलिसांकडून सोमवारी (ता. ३०) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सेनगाव तालुक्यातील कवरदडी येथील सावकारी करणाऱ्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी शेत जमीन ताब्यात घेतल्यामुळे संबंधित सावकाराचे कुटुंब वाद असलेल्या या शेतामध्ये काम करत होते. कवरदडी शिवारातील गट नंबर १३८ या शेत जमीनीवर गावातील लक्ष्मण कुंदर्गे यांनी ताबा केला होता. रविवारी (ता. २९) दुपारच्या सुमारास लक्ष्मण कुंदर्गे व त्यांच्या पत्नीसह सर्व कुटुंब या शेतामध्ये गवत कापनीसाठी आलेले होते. लक्ष्मण कुंदर्गे व रंगराव कुंदर्गे यांच्यात बऱ्याच दिवसांपासून वाद होता. रंगराव कुंदर्गेसह दोन महिला या शेतामध्ये येऊन लक्ष्मण कुंदर्गे आणि त्यांच्या कुटुंबाला गवत कापण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत होते. यांच्यातला वाद वाढत चालल्यामुळे कैलास कुंदर्गे यांनी सेनगाव पोलीस ठाण्यात येऊन घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.
हेही वाचा - Success story:पळसा येथील शेतकऱ्याने एक हेक्टर शेतीत रोपवाटिका व फळबागेतुन घेतले चांगले उत्पन्न -
यानंतर सेनगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अभय माकने व इतर अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी बाळू कुंदर्गे गांवकऱ्यांना एकत्र करून वाद घालत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांची चौकशी करण्यासाठी पोलीसांनी बाळू कुंदर्गे, यांना ताब्यात घेतले. यावेळी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व साक्षीदार यांना थापड बुक्क्यांनी मारहाण करून व धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी व जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या जमाव बंदीच्या आदेशाचे उलंघन केल्यामुळे पोलिस उपनिरीक्षक अभय माकने यांच्या फिर्यादीवरुन आरोपी रंगराव कुंदर्गे, गजानन कुंदर्गे, विष्णु कुंदर्गे, तुकाराम कुंदर्गे, राजू कुंदर्गे, अरुण कुंदर्गे, प्रकाश कुंदर्गे, पंडित कुंदर्गे, भगवान कुंदर्गे, नामदेव कुंदर्गे, आदित्य कुंदर्गे, आनंदा कुंदर्गे, बाळू कुंदर्गे, दशरथ कुंदर्गे, गजानन कुंदर्गे, उमेश कुंदर्गे, प्रकाश कुंदर्गे, सुनील कुंदर्गे, संदीप कुंदर्गे, नितिन कुंदर्गे, पंजाब कुंदर्गे, संतोष कुंदर्गे, रंगराव कुंदर्गे यांच्यासह इतर जणांवर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील तीन जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. तर कवरदडी येथील ग्रामस्थ व महिलांना पोलिसांकडून मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे