भरदिवसा घरात मुलांना बांधून ठेवले; महिलेवर वार करुन पळवले साडेचार लाख | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thief

भरदिवसा घरात मुलांना बांधून ठेवले; महिलेवर वार करुन पळवले साडेचार लाख

हिंगोली : शहरातील बियाणी नगर भागात गुरुवारी ता.३० भरदुपारी घरात शिरलेल्या दोन चोरट्यांनी महिलेवर चाकूने वार करून जखमी केले. महिला व त्यांच्या मुलांना घरात बांधून ठेवत घरातील चार लाख पन्नास हजाराचा ऐवज पळविल्याची घटना दुपारी घडली आहे. (Marathwada Crime News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील बियाणी नगर भागात भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी अविनाश कल्याणकर यांचे घर आहे. गुरुवारी सकाळी कल्याणकर हे बँकेत गेले होते. घरी त्यांच्या पत्नी अंजली कल्याणकर, मुलगा दिव्य कल्याणकर व दोन लहान जुळे मुले होती. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी घराची बेल वाजवली. यावेळी अंजली कल्याणकर यांनी दरवाजा उघडताच चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखविला.

हेही वाचा: शिष्यवृत्ती परीक्षेत तळेगाव ढमढेरेची तनिष्का गायकवाड राज्यात प्रथम

यावेळी त्यांनी चोरट्यांशी दोनहात करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांनी त्यांच्या हातावर चाकूने वार केला. शांत बसा अन्यथा मुलांना जिवे मारील अशी धमकी त्यांना दिली . त्यामुळे त्या शांत झाल्या . चोरट्यांनी अंजली यांचे हायपाय दोरीने बांधून त्यांना पलंगावर बसविले . त्यानंतर घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम ताब्यात घेऊन जातांना दिव्य याचे हात बांधले चोरट्यांनी दुचाकीवरून पोबारा केला.

चोरटे गेल्याचे लक्षात आल्यानंतर अंजली कल्याणकर यांनी दिव्य याचे हात सोडून त्याला घराच्या खाली पाठविले . त्याने हा प्रकार शेजाऱ्यांना सांगितला. तसेच घ तातडीने पोलिसांना दिली. तसेच घरमालक दीपक अग्रवाल यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली . पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचा: टीईटी गैरव्यवहार : सुपेचा ड्रायव्हर पाठवायचा आरोपींना विद्यार्थ्यांची नावे

या घटनेत जखमी झालेल्या अंजली कल्याणकर यांना उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु आहे.

Web Title: Hingoli City Criminal Attack Thief

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimeMarathwada