हिंगोली : जिल्ह्यात ३१ गावात विविध ठिकाणी आढळले दुषीत पाण्याचे नमुने

राजेश दारव्हेकर
Thursday, 24 December 2020

ज्यामध्ये सेनगाव तालुक्यात २५ , कळमनुरी तालुक्यात नऊ , वसमत तालुक्यात चार तर हिंगोली तालुक्यात सर्वाधिक कमी एकमेव एका गावात दुषित पाण्याचे नमुने आढळले आहेत

हिंगोली : जिल्ह्यातील अनेक गावांच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते . प्रयोग शाळेत तपासणी अंती जिल्ह्यातील ३९ गावामधील दुषीत पाण्याचे नमुने आढळून आले आहेत. 

ज्यामध्ये सेनगाव तालुक्यात २५ , कळमनुरी तालुक्यात नऊ , वसमत तालुक्यात चार तर हिंगोली तालुक्यात सर्वाधिक कमी एकमेव एका गावात दुषित पाण्याचे नमुने आढळले आहेत. जिल्ह्यातील अनेक गावात वरिष्ठ भुवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. सदरील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात आले असता ३९ गावातील विविध ठिकाणी अनुजैविक तपासणीत दुषित पाण्याचे नमुने आढळून आले. 

ज्यामध्ये हिंगोली प्रयोगशाळेत हिंगोली तालुक्यातील कानडखेडा येथील शाळेजवळील विद्युत प़ंप, वसमत उपविभागीय प्रयोगशाळेत तपासलेल्या वसमत तालुक्यातील दामडी ग्रा. पं.जवळील हातपंप, जवळा बुद्रुट येथील संभाजी जाधव यांच्या घराजवळील हातपंप मुडी फाट्याजवळील हातपंप, पार्डी खुर्द दर्गाहजवळील विहीर तर कळमनुरी उपविभागीय प्रयोगशाळेत तपासलेल्या मोरवड हनुमान मंदिराजवळील बोअरवेल ठाकरे यांच्या घराजवळील व मारोती मंदिरानजीकचा बोजरवेल, दांडेगाव येथे आव्हाड यांच्या घराजवळीला हातपंप, दलित वस्तीतील  हातपंप, कवडी येथे रमेश पतगे व बामनाजी दळवे यांच्या घराजवळील हातपंप, बेलमंडळ येथे पांडोजी मुघळ यांच्या घराजवळील विहीर तर नागोराव मुधळ व नरवाडे यांच्या घराजवळील हातपंप.

हेही वाचाउमरी तालुक्यातील रस्त्यांचे काम प्रगतीपथावर -

 सेनगाव उपविभागीय उपविभागीय प्रयोगशाळेत तपासलेल्या सेनगाव तालुक्यातील भानखेडा तलावाजवळील विहीर, भानखेडा तांडा येथे प्रल्हाद राठोड यांच्या घराजवळील बोअरवेल, हनकदरी येथे जलस्वराज्य व सार्वजनिक नळ योजनेची विहीर, पानकनेरगावात जलस्वराज्यची विहीर व जिल्हा परिषद शाळा व रुग्णालयाजवळील  बोअरवेल व राजाराम कांबळे यांच्या घराजवळील हातपंप,  सिंदेवाडी येथे तुळशीराम शिंदे यांच्या शेताजवळील विहीर , हातला पेथे मुस्लिम गल्ली , सखाराम काळे यांच्या घराजवळील विहीर, जांब आंध येथे सार्वजनिक नळ योजना व नदी जवळील विहीर , कापडसिंगी येथे भगवान देवकते यांच्या घराजवळील, तसेच धोत्रे यांच्या घराजवळील हातपंप, काळकोंडी येथील काळाखिल्ला तांडा येथील विहीर, कापडसिंगी येथील कलाबाई यांच्या घराजवळील हातपंप, म्हाळसापूर येथे मारोती मंदीर, म्हाळसाई देवी मंदीर जलस्वराज्याची विहीर आणि बसस्टॅण्डजवळील हातपंपाचे दुषित पाण्याचे नमुने आढळले .

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Contaminated water samples found at various places in 31 villages in the district hingoli news