हिंगोलीत कोरोनाकंप : नव्याने ५६ रुग्णांची भर, त्यात ३३ एसआरपीएफचे जवान बाधीत

file photo
file photo

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (ता. ३१) रात्री नव्याने ५६ कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत. त्यातील आठ रुग्ण अॅन्टीजन तपासणीत पॉझिटिव्ह आले आहेत तर एका कोरोना रुग्णाचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.

शहरातील देवगल्ली येथील एक, ५५ वर्षीय पुरुष जिल्हा परिषद क्वार्टर येथील तीन यात ७२ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय स्त्री, १३ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. तसेच एस.आर.पी. एफमधील सर्व जवान वय वर्षामध्ये ३१, ३३, ३४, ३३, ३६, ३४, ३३, २९, २२, २४, ३१, २६ , ३२, ३३, ३२, ३४, ३३, ३५ , ३२, ३१, ३०,३४, ३५, ३५, ३८, ३४, ३५, ३७, ३५, ३७, ३६, ४३, ५१ अशा ३३ जणांचा समावेश आहे.

येथे आहेत उपचार सुरु 

वसमत येथील जवाहर काॅलनी येथील २० वर्षीय पुरुष, २१ वर्षीय स्त्री , २६ व २७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. ( अॅन्टीजन टेस्ट ) तसेच  वसमत येथील बॅंक कॉलनी येथील चार जण आहेत. यात दोन महिण्याचा मुलगा, ६२ वर्षीय पुरुष, ५८ व ३० वर्षाची स्त्री (अँन्टीजन टेस्ट), हिंगोली येथील तोफखाना येथील ६५ वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. संमती कॉलनी येथील एका ५६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर मंगळवारा येथील एका २५ वर्षीय स्त्री आहे. , वसमत येथील मंगळवार पेठ येथील ३६ वर्षीय स्त्री,  तर स्त्री रुग्णालय क्वॉटर्स येथील एक ३० वर्षाचा पुरुष, हिंगोली तालुक्यातील सवंड येथील ४७ वर्षीय स्त्री,  समगा येथील पंतगे काॅलेज समोरील एक ३० वर्षाचा पुरुष, वसमत तालुक्यातील चोंढी स्टेशन येथील ४० वर्षाची स्त्री, कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील ६० वर्षाचा पुरुष, कळमनुरी बुरसे गल्ली येथील ६२ वर्षाचा पुरुष व जवाहर काॅलनी वसमत येथील ५७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

हिंगोली येथील एका रुग्णाचा मृत्यू 

हिंगोली येथील श्रीनगर ८० वर्षी पुरुष यांचा आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे कोरोनाच्या आजाराने मृत्यु झाला आहे . 
शुक्रवारी (ता. ३१) रोजी पाच कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये कोरोना केअर सेंटर कळमनुरी ( दोन कोरोना रुग्ण )  एक आखाडा बाळापुर, एक भाजीमंडी कळमनुरी, कोरोना केअर सेंटर वसमत ( दोन कोरोना रुग्ण ) दोन्ही पारडी येथील. कोरोना केअर सेंटर    लिंबाळा ( एक कोरोना रुग्ण ) कन्हेरगाव नाका येथील. शुक्रवारी (ता. ३१) रोजी हिंगोली जिल्ह्यात ५६ नवीन कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत. 

आजपर्यंत ६,९२२ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे

आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात कोविड-१ ९ चे एकुण ६५४ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ४३५ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण २११ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि आठ कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातंर्गत आयसोलेशन वार्ड, सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंटाईन सेंटर अंतर्गत एकूण ७,४५१ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी ६,६६२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ६,९२२ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीला ५०५ व्यक्ती भरती आहेत. आणि १६० अहवाल येणे     प्रलंबित आहे. जिल्ह्यातील आठ कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. श्रीवास यांनी दिली.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com