esakal | हिंगोली : ७५ लक्ष रुपयाच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेला मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

राज्यसरकारने हिंगोली येथील प्रयोगशाळेला मंजुरी दिली असून उभारणीसाठी ७५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

हिंगोली : ७५ लक्ष रुपयाच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेला मंजुरी

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली येथे कोरोना रुग्णाच्या लाळेचे नमुने तपासण्याकरिता प्रयोगशाळा उभारण्यात यावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषद  (ICMR ) यांच्याकडे केली होती. त्यानुसार राज्यसरकारने हिंगोली येथील प्रयोगशाळेला मंजुरी दिली असून उभारणीसाठी ७५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत असून या आजारामध्ये लवकरात लवकर रुग्णांचे  स्वाबचे (लाळेचे) नमुने तपासण्यासाठी आणि तात्परते इलाज करण्यासाठी मराठवाड्यात नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नांदेड पाठोपाठ हिंगोली येथे सुद्धा कोरोना संसर्ग लाळ तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात यावी अशी मागणी खासदार पाटील यांनी केली होती.

हेही वाचा भाजपचे जेष्ठ नेते सरदार तारासिंह यांचं लिलावातीमध्ये दीर्घ आजाराने निधन

पुणे आणि औरंगाबाद येथील प्रयोगशाळांचा ताण कमी

यापूर्वी हिंगोली, नांदेड आणि आसपासच्या जिल्हयातील रुग्णांच्या लाळेचे नमुने पुणे आणि औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. नमुने तपासून अहवाल येण्यासाठी वेळ लागत होता, त्यांनतर राज्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नांदेड येथे प्रयोगशाळा उभारण्यात आल्यामुळे काही प्रमाणात का होईना पुणे आणि औरंगाबाद येथील प्रयोगशाळांचा ताण कमी झाला आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लाळ नमुने तपासणी प्रयोगशाळा हिंगोली येथे करण्यात यावी ही बाब निदर्शनास आणून दिली होती.

येथे क्लिक करा - नांदेड जिल्ह्यात पावसामुळे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

उभारणीसाठी ७५ लाखाचा निधीसुद्धा मंजूर

तसेच या प्रयोगशाळेचा विदर्भातील काही जिल्ह्याना फायदा होऊ शकतो आणि काही तासात तपासणी अहवाल आल्यांनतर तात्काळ उपचार करता येऊ शकतील. तसेच तपासणीसाठी लागणाऱ्या जनुकीय मटेरिअलद्वारे व्हायरसचे निदान करण्याच्या सुविधेसाठी अत्याधुनिक उपकरण यंत्रणा सुद्धा उभारण्यात यावी. राज्यसरकारने हिंगोली येथील प्रयोगशाळेला मंजुरी दिली आहे. सोबतच उभारणीसाठी ७५ लाखाचा निधी सुद्धा मंजूर केला आहे. त्यामुळे आता हिंगोली येथील प्रयोगशाळा उभारणीस नक्किच वेग मिळणार आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image
go to top