esakal | हिंगोली : दसऱ्यांच्या मुहूर्तावर बाजारात विविध वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोनामुळे सहा महिन्याहून अधिक काळ बाजारपेठा बंद होत्या . दसऱ्यानिमित्ताने बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे . दसऱ्यांच्या मुहूर्तावर सोने चांदी , वाहन खरेदी केली जाते

हिंगोली : दसऱ्यांच्या मुहूर्तावर बाजारात विविध वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या दसरा सणानिमित्ताने बाजारपेठेत झेंडूची फुले यासह पुजेचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची रविवारी (ता. २५) गर्दी झाली होती.

कोरोनामुळे सहा महिन्याहून अधिक काळ बाजारपेठा बंद होत्या. दसऱ्यानिमित्ताने बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. दसऱ्यांच्या मुहूर्तावर सोने चांदी, वाहन खरेदी केली जाते. या नवरात्सोवात जवळपास शंभर ते दिडशे चारचाकी वाहनाची व पाचशे ते सहाशे दुचाकी वाहनांची बुकिंग झाली आहे. रविवारी दसऱ्यांच्या मुहूर्तावर या वाहनांची डिलेव्हरी देण्यात आली असल्याचे विक्रेते नरेश देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचाशॉर्टसर्किटमुळे सहा एकरवरील ऊस जळून खाक, आमदार कल्याणकरांची भेट -

विविध व्यापाऱ्यांनी सांगितले

दरम्यान दसऱ्या निमित्ताने झेंडूच्या फुलाना चांगली मागणी असते त्यामुळे येथील गांधी चौकात फुले विक्रीसाठी उपलब्ध झाली होती. सकाळी ऐंशी रुपये किलो प्रमाणे तर नंतर फुलांची आवक वाढल्यावर भावात घसरण झाली चाळीस ते पन्नास रुपये प्रमाणे फुलांची विक्री झाली असल्याचे गजानन चव्हाण यांनी सांगितले. सोने खरेदीला देखील महत्त्व असल्याने सराफा बाजारात देखील आज गर्दी होती आज दहा ग्रँम सोन्याचा भाव ५२ हजार सहाशे तर चांदी ६४ हजार रुपये किलो असल्याचे विक्रेते कैलास खर्जुले यांनी सांगितले.

विविध वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात आज गर्दी

दरम्यान, मागच्या सहा महिन्यापासून कोरोना मुळे बाजारात ग्राहक खरेदीसाठी धजावत नव्हते मात्र दसरा सणासाठी लागणार्या विविध वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात आज गर्दी होती. अनेक दिवसांपासून थंड असलेल्या बाजारात विविध वस्तूचा उठाव झाला होता. 

येथे क्लिक करानांदेड जिल्ह्यात बाधीत क्षेत्रात वाढ; ३८५ कोटींची मदतीची मागणी -

आवक वाढल्यावर भावात घसरण झाली

झेंडू विक्रीसाठी देखील उत्पादक बाजारात दाखल झाले होते. अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेली फूले उत्पादकांनी विक्रीसाठी आणली होती. सकाळी फुलांना शंभर रुपयाचा भाव मिळाला मात्र त्यानंतर आवक वाढल्यावर भावात घसरण झाली चाळीस ते पन्नास रुपये प्रमाणे त्याची विक्री झाली. सराफा बाजारात देखील खरेदीसाठी वेग आला होता. रविवारी असताना देखील दसरा सणामुळे बाजारातील दुकाने उघडी होती. अनेकांनी नवीन प्रतिष्ठाने सुरु केली आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे