हिंगोली : कळमनुरीत कंटेनरने एकास चिरडले

कंटेनरणे एकास चिरडल्याची घटना मंगळवारी घडली आहे
accident
accidentsakal

वारंगा फाटा: कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपासमोर भरधाव जाणाऱ्या कंटेनरणे एकास चिरडल्याची घटना मंगळवारी ता.२६ घडली आहे. याबाबत माहिती अशी की वारंगाफाटा येथे पेट्रोल पंपा समोर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरने एकास चिरडल्याची घटना घडली. दुचाकीवर उत्तमराव शिखरे वय ४८ वर्षे राहणार येडशी तालुका कळमनुरी हे निनावी मोटरसायकलवरून जात असतानामंगळवारी दुपारी आडीच तज तीनच्या दरम्यान कंटेनर खाली आल्याने चिरडून जाऊन जागीच मृत्यू झाला संबंधित कंटेनर ड्रायव्हर हा आपल्या कंटेनर क्रमांक आर जे २७ जीसी ७६६३ घेऊन पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला कुर्तडी शिवारात खालसा धाब्या जवळ पकडले.

घटनास्थळी तात्काळ पोलिसांनी दाखल होऊन मृतदेहास शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आखाडा बाळापूर येथे पाठविण्यात आले. घटनास्थळी बीट जमादार शेख बाबर,फौजदार श्री.बोंडले, यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com