Hingoli : विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ;आ. बांगर

कळमनुरी येथे अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता
Santosh Bangar News
Santosh Bangar Newsesakal

कळमनुरी : लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गुरू तोटलिंग स्वामी मठ संस्थानाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार संतोष बांगर यांनी मंगळवारी (ता. सहा) दिली.

या संस्थानमध्ये आयोजित अखंड शिवनाम सप्ताहाच्या सांगतेप्रसंगी आमदार बांगर बोलत होते. यावेळी शंकर लिंग शिवाचार्य महाराज शिरूर अनंतपाळकर, महादेव शिवाचार्य महाराज कळमनुरीकर, माजी नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, माजी सभापती फकिरा मुंडे, धनंजय पाटील, सुरेंद्र ढाले, नितीन होकर्णे, राजीव नागरे, बबलू पंचलिंगे यांच्यासह महिला व नागरिकांची उपस्थिती होती.

श्री तोटलिंग स्वामी मठ संस्थानाच्या विकासासाठी आमदार बांगर यांनी उपलब्ध करून दिलेल्या विकास निधीमधून झालेल्या कामाची माहिती महादेव शिवाचार्य महाराज यांनी यावेळी दिली. शंकर लिंग शिवाचार्य महाराज शिरूर अनंतपाळकर यांच्या हस्ते आमदार बांगर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार बांगर म्हणाले, लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गुरू तोटलिंग स्वामी संजीवन समाधी मठ संस्थांनच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com