
हिंगोली जिल्ह्यात बारा मंडळात अतिवृष्टी
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात मागील चोवीस तासात गुरुवारीता. १४ सकाळी आठ वाजेपर्यंत ५९.४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील १२ मंडळात मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या पावसाने पिकांचे नुकसान देखील झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक माळहिवरा ८४ व हिंगोली मंडळात ८० मिलीमीटर पाऊस झाला आहे. आज पावसाचा जोर कमी झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागच्या सहा दिवसापासून सलग पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ५९.४० मिलीमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये हिंगोली तालुका ६९.४० मिलीमीटर, कळमनुरी ७६.१० वसमत ४९.४० औंढा ६०.५० तर सेनगाव तालुक्यात ४२.१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
म़ंडळनिहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे हिंगोली मंडळात ८०.४ नर्सी नामदेव ६३.३, सिरसम ७५.३, बासंबा ५३.५, डिग्रस ६५.५, माळहिवरा ८४, खांबाळा ,६३.३ तर हिंगोली तालुका एकुण ६९.४० मिलीमीटर पाऊस झाला. कळमनुरी मंडळात ७८, मिलीमीटर वाकोडी ९७.३०, नांदापुर ८६.५०, बाळापुर ६८.८० डोंगरकडा ६६.५०, वारंगा ६० एकुण ७६.१० मिलीमीटर पाऊस झाला.
वसमत मंडळात वसमत ४७.८०, आंबा ५८.३०, हयातनगर ४५.८० गिरगाव ६२.३०, हट्टा ३२.८० टेभुर्णी ४०.५, कुरुंदा ५८.३०, मिलीमीटर पाऊस झाला तालुक्यात ४९.५० मिलीमीटर पाऊस झाला. औंढा म़डळात ५९.५,येहळेगाव ७६.५०, साळणा ५९.५०, जवळा ६०.५०, एकुण
६०.५० मिलीमीटर पाऊस झाला. सेनगाव मंडळात ३३.५०, गोरेगाव ६८, आजेगाव ४६.५० साखरा ३२.८०, पानकनेरगाव ४१.८०, हत्ता ३९.८० तर एकुण ४२.१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, बुधवार साडेअकरा पासून पावसाचा जोर वाढला आहे. कळमनुरी तालुक्यातील धांडे पिंपरी जवळुन वाहणाऱ्या ओढ्याला आलेल्या पाण्याने धांडे पिंपरी ते बाळापूर रस्ता बंद झाला आहे. बाळापूर येथून वाहणाऱ्या एका नाल्याचे पाणी बाळापूर वाडी येथील काही जणांच्या घरात शिरले आहे.
Web Title: Hingoli District Heavy Rains Twelve Mandals
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..