पतंजली कोविड टिम कोरोना काळात ऑनलाईन मार्गदर्शन करणार

पतंजली कोविड टिम कोरोना काळात ऑनलाईन मार्गदर्शन करणार
Summary

जिल्ह्यातील नागरिकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, यासाठी जिल्ह्यातील कोविड सेंटर आणि आरोग्य विभागास आपल्या स्तरावरुन सुचित करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

हिंगोली : जिल्हा पतंजली कोविड मार्गदर्शक (patanjali covid guide) टिम कोरोना काळात ऑनलाईन मार्गदर्शन (online guidance) करण्यास तयार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (Collector Ruchesh Jayavanshi) यांना देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, संपूर्ण जगाला निरोगी जीवनासाठी योग आणि आयुर्वेदचा मंत्र देऊन प्रचार आणि प्रसार करणारे योगगुरु स्वामी रामदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सर्व जिल्ह्यात कोविड मार्गदर्शक टिम तयार करण्यात येत असून हिंगोली जिल्हा टिम जाहिर करण्यात आली आहे.

(Hingoli district patanjali covid guide team corona will provide online guidance during the period)

पतंजली कोविड टिम कोरोना काळात ऑनलाईन मार्गदर्शन करणार
विद्यार्थ्यांनी शिक्षणासह सामाजिक बांधिलकी जोपासावी : कुलपती कोश्यारी

या टीममध्ये राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ.माधुरी शास्त्री, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी मन्मथ गुमटे, भारत स्वाभिमान प्रभारी दत्तात्रय लेकूळे, किसान प्रभारी मदनराव शिंदे, युवा प्रभारी संदीप काळे, सह युवा प्रभारी सुनिल मुळे, महिला प्रभारी रक्षा बगडिया, जिल्हा संघटनमंत्री विठ्ठल सोळंके, योग मार्गदर्शक डॉ संजय नाकाडे, योग मार्गदर्शक प्रा. भानुदास राठोड, योग मार्गदर्शक बालाजी जाधव आदींचा समावेश आहे.

सदर मार्गदर्शक टिमचे सदस्य जिल्हातील कोरोना रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना कोविड काळात निरोगी राहण्यासाठी योग व आयुर्वेदिक औषध यांच्या बाबतीत ऑनलाईन मार्गदर्शन करतील. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, यासाठी जिल्ह्यातील कोविड सेंटर आणि आरोग्य विभागास आपल्या स्तरावरुन सुचित करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

(Hingoli district patanjali covid guide team corona will provide online guidance during the period)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com