esakal | हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस, मागील चोवीस तासात २५.२८ मिलीमीटर पावसाची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दमदार पाऊस झाला या पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या कयाधु नदीला पुर आला. तर पिंपळदरी ओढ्याला पुर आल्याने अनेक गावचा संपर्क तुटला

हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस, मागील चोवीस तासात २५.२८ मिलीमीटर पावसाची नोंद

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) सकाळी सातपासुन ते साडेआठपर्यंत मेघगर्जनेसह दमदार पाऊस झाला या पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या कयाधु नदीला पुर आला. तर पिंपळदरी ओढ्याला पुर आल्याने अनेक गावचा संपर्क तुटला. मागील चोवीस तासात २५. २८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पावसाचे आगमन झाले आहे. मागील चोवीस तासात गुरुवारी (ता. १६) सकाळी आठवाजेपर्यंत २५. २८ मिलीमीटर   पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मंडळ निहाय पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे तीन मंडळात अतिवृष्टी झाली. यात औंढा नागनाथ, येहळेगाव व कुरूंदा मंडळाचा समावेश आहे.

हिंगोली तालुका 

हिंगोली तालुक्यातील हिंगोली मंडळात २५ .० मिलीमीटर  पाऊस झाला. खांबाळा २० माळहिवरा १९, सिरसम ३६, बासंबा ३६, नरसी २२,  डिग्रस ४०    एकुण १७७ मिलीमीटर तर सरासरी २५. २९ मिलीमीटर पाऊस झाला.

हेही वाचाशंकररावांचा प्रेरणादायी सहवास मला लाभला : डॉ. सुरेश सावंत

कळमनुरी तालुका

कळमनुरी १५.०, नांदापुर १५ .०, बाळापुर २१.०, डोंगरकडा ४५.०, वारंगाफाटा  ५.०, वाकोडी १०.० तर एकुण १०९.० सरासरी १८.१७ मिलीमीटर पाऊस झाला. सेनगाव ९.०, गोरेगाव २.०, आजेगाव ६.०, साखरा निरंक, पानकनेरगाव ८.०, हता १४.० एकुण ३९.० तर सरासरी ६.५० मिलीमीटर पाऊस झाला.

वसमत तालुका

वसमत मंडळात १५.० मिलीमीटर, हट्टा निरंक, गिरगाव ४२.०, कुरूंदा ८४.०, टेंभुर्णी ३५.०, आंबा ८.०, हयातनगर निरंक एकुण १८५ .० तर सरासरी २६.४३ मिलीमीटर पाऊस झाला. औंढा नागनाथ मंडळात ६४.०, जवळा बाजार २५.०, येहळेगाव  ९४.०, साळणा १७.० एकुण २००.० तर सरासरी ५०.० मिलीमीटर पाऊस झाला जिल्ह्यात २५.२८ मिलीमीटर पाऊस झाला. 

ओढ्याला आलेल्या पुरामुळे पिंपळदरी ते नांदापुर जाणारा मार्ग बंद

दरम्यान, आज सकाळी झालेल्या दमदार पावसाने शहरातून वाहणाऱ्या कयाधु नदीला पुर आला होता. तर औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथून वाहणाऱ्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे पिंपळदरी ते नांदापुर जाणारा मार्ग बंद झाल्याने अनेक गावचा संपर्क तुटला तर पुराचे पाणी शेतात गेल्याने पिकांचे नुकसान झाले तर पाण्याने विहिरी देखील बुजल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक नदी नाल्याना पाणी आले होते. तसेच आज दिवसभर पावसाचा मुक्काम असल्याचे वातावरण होते सकाळी सात ते साडेदहा पर्यंत पावसाची संततधार सुरुच होती. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

संपादन- प्रल्हाद कांबळे