हिंगोली जिल्ह्यातुन सेवा सहकारी संस्था मतदारसंघातुन, आमदार नवघरे, अॅड. माने, राजेश पाटील गोरेगावकर विजयी, जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक

file photo
file photo

हिंगोली : परभणी, हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातील सेवा सहकारी मतदारसंघाच्या सर्व जागांचे निकाल मंगळवारी (ता. २३)  जाहिर झाले आहेत. यात आमदार राजु नवघरे, माजी खासदार अँड शिवाजी माने, राजेश पाटील गोरेगावकर विजयी झाले आहेत. तर यापूर्वी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर विजयी झाले आहेत.

आमदार आमदार राजू नवघरे यांनी वसमतमधून त्यांचे प्रतिस्पर्धी सविता नादरे यांचा पराभव केला . नवघरे यांना ६७ तर श्रीमती नादरे यांना केवळ नऊ मते मिळाली. औंढानागनाथ सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून राजेश पाटील गोरेगावकर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शेषराव कदम यांचा पराभव केला . गोरेगावकर यांना ३४ तर कदम यांन २८ मते मिळाली, कळमनुरी मतदारसंघातून माजी खासदार अँड. शिवाजीराव माने यांनी विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी तथा विद्यमान संचालक सुरेश वडगावकर याचा पराभव केला. माने यांना ४६ तर वडगावकर यांना ३९ मते मिळाली. 

सेवा सहकारी संस्था मतदारसंघात वरपुडकर गटाचे  आमदार नवघरे , राजेश पाटील गोरेगावकर हे दोन तसेच यापुर्वी बिनविरोध निवडून आलेले साहेबराव पाटील गोरेगावकर  यांचा समावेश आहे. ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर  गटाचे आमदार तान्हाजी मुटकुळे  हे  यापुर्वीच बिनविरोध निवडून आले होते. आता अँड . शिवाजी माने निवडून आले आहेत. यामुळे हिंगोली जिल्ह्यात आमदार सुरेश वरपुडकर गटाचे तीन तर बोर्डीकर गटाचे दोन संचालक निवडून आले आहेत. विद्यमान संचालक सुरेश वडगावकर यांचा अँड. शिवाजीराव माने यांनी सात  मतानी पराभव केला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com