Fri, June 2, 2023

Hingoli : नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करा ; आमदार संतोष बांगर
Published on : 22 March 2023, 7:39 am
हिंगोली : जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार संतोष बांगर यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे निवेदनाद्वारे मंगळवारी (ता. २१) केली आहे.
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी राज्याचे बंदरे व खणीकर्म मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.