esakal | हिंगोली जिल्ह्याची हंगामी पैसेवारी ६४.५९ टक्के
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शासनस्तरातून शेतकऱ्याना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे केली जात जाहे . अशातच खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी जिल्हा प्रशासनाने जाहिर केली जाहे

हिंगोली जिल्ह्याची हंगामी पैसेवारी ६४.५९ टक्के

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील पिके चांगलीच बहरली होती . वेळेत पाऊस झाल्याने पिकाचे उत्पादन वाढेल असा अंदाज लावला जात होता. मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीपातील सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे.  त्यामुळे शासनस्तरातून शेतकऱ्याना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे केली जात जाहे. अशातच खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी जिल्हा प्रशासनाने जाहिर केली जाहे. जिल्ह्याची हंगामी पैसेवारी ६४.५९ टक्के काढण्यात आली आहे .

ही पैसेवारी नुकसानीच्या आर्थिक मदतीसाठी पुरेसी असणार नाही , सुधारीत व अंतिम पैसेवारी कडे शेतकयांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात  लागवडी योग्य खालील क्षेत्र हे ४ लाख २ हजार ५६१.३२ हेक्टर आहे. त्यातील ३ लाख ८४ हजार १८०.०३ हेक्टरवर खरीपाची पेरणी करण्यात आली तर १८ हजार हजार ३०.९ १ हेक्टर क्षेत्र पडीक आहे.

हेही वाचा -  Video - माहूरगडावर श्री रेणुकादेवीची उत्साहात घटस्थापना

६१ हजार ९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली

त्यात हिंगोली तालुक्यात ९ ० हजार १५ हेक्टर क्षेत्र लागवड करण्यात आली आहे तर २ हजार ४५७.३८ हेक्टर पडीक आहे . कळमनुरी तालुक्यात ७६ हजार  ६९५. ९७ हेक्टर क्षेत्र लागलडी खाली त्यापैकी ७३ हजार ९९९ ९७ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. तर २ हजार ६९६ हेक्टर क्षेत्र पडीक आहे. सेनगाव तालुक्यात ९ २ हजार ६२ ९ .४४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. ९ ० हजार २४२.०६ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे तर २ हजार ४५७.३८ हेक्टर क्षेत्र पडीक आहे. वसमत तालुक्यात हजार २८ हेक्टर क्षेत्र लागवडी खालील आहे . त्यापैकी ७८ हजार ७०२. हेक्टर वर पेरणी करण्यात आली आहे तर १ हजार १२६ हेक्टर क्षेत्र पडीक आहे . औंढा तालुक्यात ६६ हजार १२२.९१ हेक्टर क्षेत्र लागवडीचे आहे. त्यापैकी ६१ हजार ९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली तर दोन हजार ३०.९१ हेक्टर क्षेत्र पडीक आहे.

खरीप हंगामाची टक्केवारी ५० टक्के पेक्षा कमी असल्यास शासनाकडुन नुकसानीची भरपाई मिळते

पेरणी केलेल्या क्षेत्रावरील पिकांची हंगामी पैसेवारी गावनिहाय जाहिर करण्यात आली आहे . त्यात एकाही गावाची अथवा  तालुक्याची पैसेवारी ५०   टक्केच्या खाली काढण्यात आली नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही पैसेवारीची टक्केवारी मोठ्या प्रमाणात जाहिर करण्यात आल्याने शेतकऱ्यांतुन नाराजी व्यक्त केली जात आहे . कारण खरीप हंगामाची टक्केवारी ५० टक्के पेक्षा कमी असल्यास शासनाकडुन नुकसानीची भरपाई मिळते . गतवर्षीही हंगामी पैसेवारी मोठ्या प्रमाणावर काढण्यात जाली होती , सुधारित पैसेवारीमध्ये देखील बदल झाला नकता . मात्र परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते , त्यामुळे अतिम पैसवारी ५० टक्के पेक्षा कमी जाहिर झाली होती. यावर्षी सुरवातीलाच पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हंगामी पैसेवारी कमी मिळण्याची अपेक्षा होती मात्र तसे झाले नाही. आता ३० आँक्टोंबर रोजी जाहीर  होणाऱ्या सुधारित तर १५ डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे