Hingoli Earthquake :हिंगोली जिल्हा भूकंपाने पुन्हा हादरला ;गडाळा, पांगरा शिंदे येथे केंद्रबिंदू; भिंतींनाही तडे

Hingoli Earthquake, 4.5 Richter, Pangra Shinde : हिंगोली जिल्ह्यात शनिवारी ४८ तासांत दोन भूकंपाचे धक्के जाणवले. पहिल्या धक्क्याची तीव्रता ३.३ तर दुसऱ्या धक्क्याची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल होती.
Earthquake tremors were recorded in Hingoli district, with the strongest shock measuring 4.5 on the Richter scale.

Earthquake tremors were recorded in Hingoli district, with the strongest shock measuring 4.5 on the Richter scale.

esakal

Updated on: 

हिंगोली, : भूकंपाच्या एकापाठोपाठ दोन धक्के व तीनवेळा भूगर्भातील आवाजाने शनिवारी (ता. तीन) सकाळी जिल्हा पुन्हा हादरला. सकाळी ७ः४७ वाजता बसलेल्या पहिल्या धक्क्याची नोंद ३.३ रिश्टर स्केल नोंदवली. केंद्रबिंदू गडाळा येथे (ता. औंढा नागनाथ) येथे तर दुसरा धक्का ९.४३ वाजता बसला त्याची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल एवढी होती तर केंद्रबिंदू पांगरा शिंदे परिसर (ता.वसमत) येथे असल्याचे समोर आले. यामुळे अनेक ठिकाणी घराच्या भिंतीना तडे गेले. आपत्कालीन यंत्रणा कडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कुठेही वित्त आणि किंवा जीवित हानी झाली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com