हिंगोली : टोळीने गुन्हे करणाऱ्या अकरा आरोपींना केले हद्दपार- पोलीस अधीक्षक राकेश कलासागर 

राजेश दारव्हेकर
Friday, 1 January 2021

गंभीर गुन्हे टोळीने करणाऱ्या एकूण ११ आरोपीतांना जिल्हयातून हद्दपारीचे आदेश निर्गर्मीत करून आरोपीतांना तात्काळ  जिल्हयाचे हद्दीचे बाहेर काढून देण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्यास दिले असल्याची माहिती गुरुवारी ता.३१ दिली.

हिंगोली : जिल्हयातील वसमत शहर व हट्टा पोलीस ठाण्यातंर्गत खून खूणाचा प्रयत्न दरोडा तसेच गंभीर दुखापतीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार आरोपींना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारींचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गंभीर पाऊल उचलले आहे. गंभीर गुन्हे टोळीने करणाऱ्या एकूण ११ आरोपीतांना जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश निर्गर्मीत करून आरोपीतांना तात्काळ जिल्हयाच्या हद्दीच्या बाहेर काढून देण्याचे आदेश संबंधित पोलिस ठाण्यास दिले असल्याची माहिती गुरुवारी ( ता.३१)  दिली.

 

सदरचे आरोपी हे खून, खूणाचा प्रयत्न, दरोडा तसेच गंभीर दुखापतीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सदर आरोपींना हिंगोली जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असुन तसे आदेश बुधवार (ता.३९) दिले आहेत.

हेही वाचा जिल्ह्यात कोरोनाचा लपंडाव सुरुच; गुरुवारी ४२ पॉझिटिव्ह, ३७ रुग्ण कोरोनामुक्त -

सादर केलेल्या प्रस्तावातील टोळीप्रमुख भुयासिंग चव्हाण, हिरासिंग चव्हाण, दिपाकौर चव्हाण, कमलकौर चव्हाण, बाळु अविनाश, कैलास खंदारे सर्व रा. शिक्कलकरी वस्ती तसेच हट्टा ठाण्यातंर्गत प्रस्तावातील टोळी प्रमुख साहेबसिंग उर्फ बंगालसिंग चव्हाण रा. रेल्वेस्टेशन रोड वसमत व टोळीतील सदस्य महेंद्र करवंदे रा. मुडी  ता.वसमत  सुनिल  करवंदे रा. मुडी ता. वसमत  पंडीत गायकवाड रा. गणेशपुर  धम्मपाल  करवंदे रा. मुडी, रमेश  गायकवाड  रा.गणेशपुर ता.वसमत  यांना हिंगोली जिल्हयाचे हद्दीबाहेर काढून देण्याचे आदेश पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्हयातून हद्दपार केल्या बाबतचे आदेश निर्गमीत केले आहेत .

 

सदरची कार्यवाही करण्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय , पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे तसेच विलास सोनवणे यांनी कामकाज केले आहे . हिंगोली जिल्हयात असे टोळीने गुन्हे करणारे जास्तीत जास्त गुन्हेगारांविरूध्द या पुढेही हद्दपारीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक  राकेश कलासागर यांनी सांगीतले आहे .

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Eleven accused deported by gang - Superintendent of Police Rakesh Kalasagar hingoli news