
नुकसानाची टक्केवारी कमी दाखवून शेतकऱ्यांना अल्प प्रमाणात नुकसान भरपाई दिली जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. खरीप हंगामात जुन ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते.
हिंगोली : जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांची नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून हेक्टरी १० हजार रुपयांची मदत जाहिर करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना यातील निम्मीच रक्कम मिळत आहे. दोन टप्यात निधी मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागली असून ती फोल ठरणार आहे.
नुकसानाची टक्केवारी कमी दाखवून शेतकऱ्यांना अल्प प्रमाणात नुकसान भरपाई दिली जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. खरीप हंगामात जुन ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. यात सोयाबीनचे प्रमाण सर्वाधिक होते. जिल्हा प्रशासनाने संयुक्त पंचनामे केल्यानंतर हा अहवाल शासन स्तरावर मदतीसाठी पाठविला.
हेही वाचा - कोरोना समस्येचे निराकरण करण्याची घोषणा देण्याचा मान परभणीच्या वेणुगोपाल सोमाणींना
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हेक्टरी १० हजार रुपयांची मदत जाहिर केली. पुर्वी शासन यावरून निकषाप्रमाणे केवळ हेक्टर सहा हजार ८०० रुपये नुकसान मिळत होते. यात घोषणेनुसार तीन हजार २०० असतानाही रुपयांची वाढ करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपयांची मदत मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागली होती. मात्र ३३, ४०, ५०, ६० टक्के नुकसान झाल्याने पंचनाम्यात नमुद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात हेक्टरी ५ ते ६ हजार रुपयांची मदत मिळत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याला प्राप्त झालेल्या पहिल्या टप्यातील निधीचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर केले जात आहे.
दुसऱ्या मदत टप्यात उर्वरीत रक्कम जमा केली जाणार आहे. जिल्ह्याला अतिवृष्टीच्या अनुदानात टक्केवारीचा खेळ केल्याने शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई मिळणे दुरापास्त झाले आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे