हिंगोली : शहरात किरकोळ कारणावरून हाणामारी, दगडफेक

राजेश दारव्हेकर
Thursday, 31 December 2020

घटनास्थळी  शहर पोलिस ठाण्याच्या पथकासह दंगा काबू पथक दाखल झाला आहे .  परिस्थिती नियंत्रणात असली तरी वातावरण तणावपूर्ण आहे .

हिंगोली : शहरात किरकोळ कारणावरून हाणामारी हाऊन तुफान दगडफेक झाल्याची घटना बुधवारी (ता. ३०) रात्री दहाच्या दरम्यान  घडली आहे. या दगडफेकीत पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याच्या पथकासह दंगा नियंत्रण पथक दाखल झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी वातावरण तणावपूर्ण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील रिसालाबाजार भागात रात्री दहाच्या  सुमारास काही तरुण एका गल्लीत बसले होते. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या काही तरुणांना दगड मारण्यास सुरवात केली. त्यामुळे वादाला तोंड फुटले. या वादातून हाणामारी सुरु झाली. दोन्ही कडून मोठा जमाव एकत्र आला होता. यामध्ये काही जणांनी तलवारीचाही वापर केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर एका गटाने दगडफेकीला सुरवात केली. रस्त्यावर मिळेल ते दगड जमावावर भिरकावले जात होते. त्यामुळे रस्त्यावर दगड व विटांचा खच पडला होता . 

हेही वाचाग्रामपंचायत निवडणुकीसाठी नांदेड तालुक्यातून दीड हजाराहून अर्ज -

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्यासह दंगा नियंत्रण पथकही दाखल झाले होते. सध्या रिसालाबाजार परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त आहे. या घटनेमध्ये सहा जण जखमी झाल्याचेही सांगण्यात आले असून हाणामारी करणाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथके शोध घेत आहेत.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Fighting for minor reasons, stone throwing in the city hingoli news