हिंगोली : जांभरूनतांडा ग्रामपंचायतवर प्रहारचा झेंडा, बिनविरोध निवडणूक

राजेश दारव्हेकर
Thursday, 31 December 2020

येथील नागरिकांनी  राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच कार्याध्यक्ष बल्लुभाऊ जंवजाळ व संपर्क प्रमुख प्रविणभाऊ हेंडवे यांच्या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कामाची दखल घेत गावातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी गावातील सर्व पक्ष व नागरिक एकत्रित बसून सरपंच व उपसरपंच व सर्व सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली

हिंगोली : जिल्ह्यातील जांभरून तांडा येथील ग्रामपंचायतच्या सात जागेसाठी सात अर्ज दाखल झाले असून सरपंच, उपसरपंच यांची देखील प्रहार जनशक्तीच्या पदाधिकारी पुढाकार घेत या ग्रामपंचायतवर प्रहारचा झेंडा फडकविला आहे.

येथील नागरिकांनी  राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच कार्याध्यक्ष बल्लु जंवजाळ व संपर्कप्रमुख प्रविण हेंडवे यांच्या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कामाची दखल घेत गावातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी गावातील सर्व पक्ष व नागरिक एकत्रित बसून सरपंच व उपसरपंच व सर्व सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्षाचे डिगांबर राठोड यांची सरपंचपदी तर विठ्ठल जाधव उपसरपंचपदी तसेच सदस्य म्हणून वकील राठोड, अहिलाबाई चव्हाण, ज्योती  राठोड, लक्ष्मीबाई चव्हाण, सखुबाई राठोड या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जांभरून तांड्यातील गावकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा जिल्हाप्रमुख रवि उर्फ राॅबट बांगर व प्रहारचे जिल्हा संघटक विलास आघाव यांच्या कामावर विश्वास ठेवून ग्रामपंचायत बिनविरोध काढल्याबद्दल नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा प्रहारच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रहारचे युवा जिल्हाप्रमुख रवी उर्फ रॉबर्ट बांगर प्रहारचे जिल्हा संघटक विलास आघाव, प्रहारचे युवा तालुका सचिव जीवन आडे, युवा उपतालुका अध्यक्ष विष्णू चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष कुंडलिक जाधव,पोलिस पाटील शाम जाधव, नायक बापूराव राठोड, माजी सरपंच भगवान जाधव, माणिक जाधव, अविनाश जाधव, सुनील चव्हाण, राहुल जाधव, सचिन जाधव, सुनील राठोड, श्रीकांत राठोड तसेच  गावकरी  तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Flag of attack on Jambharuntanda Gram Panchayat, unopposed election hingoli news