हिंगोली : खडकाळ माळरानावर वनविभागाने निर्माण केले नंदनवन

मुजाहेद सिद्दीकी
Wednesday, 9 December 2020

हिंगोली नांदेड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या भाटेगाव शिवारातील वन विभागाची जंगलात खडकाळ माळावर मेहनत व योग्य नियोजनाच्या जोरावर सात हेक्टर क्षेत्रावर विविध प्रकारचे झाडे लावून नंदन वन निर्माण केले आहे.

वारंगा फाटा (जिल्हा हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील भाटेगावजवळ वन विभागाने खडकाळ माळरानावर विविध प्रकारची झाडे लावून हिरवळ निर्माण करून नंदनवन केले आहे.

हिंगोली नांदेड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या भाटेगाव शिवारातील वन विभागाची जंगलात खडकाळ माळावर मेहनत व योग्य नियोजनाच्या जोरावर सात हेक्टर क्षेत्रावर विविध प्रकारचे झाडे लावून नंदन वन निर्माण केले आहे.वन विभागाची वृक्षलागवड म्हटले की सामान्य नागरिकांत शंका-कुशंका घर करतात व झाडे टिकणार किती, झाडे लावण्याचा नेमका उद्देश काय आहे, याच्या लागवडीवर होणारा अमाप खर्च याबाबत तर्कवितर्क सुरू होतात मात्र या गोष्टीला हारताळ फासत  हिंगोली वनपरिक्षेत्रात येणाऱ्या भाटेगाव शिवारात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योग्य नियोजनातून नयनरम्य अशी वनराई उभी झालेली दिसून येत आहे.

हेही वाचा - नांदेड : शहरातील अंतर्गत रस्ते विकासासाठी 50 कोटींचा निधी- पालकमंत्री अशोक चव्हाण -

भाटेगाव शिवारातील वन विभागाची राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या जमिनीत वनपरिक्षेत्र अधिकारी  विश्वनाथ टाक  यांच्या मार्गदर्शनाखाली  वनपरिमंडळ अधिकारी  प्रिया साळवे  व  वनरक्षक माधव केंद्रे  यांनी  वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला यात सात हेक्टर क्षेत्रावर १० बाय १० फूट अंतरावर ७७७७  झाडांची लागवड वर्ष २०१९ मध्ये करण्यात आली त्यात प्रामुख्याने बोर,शिशु, करंज,कवट,सागवान, वड, पिंपळ, बेल आदि झाडांची लागवड करण्यात आली.  झाडांचे संगोपन करायचे म्हटले त्यातही माळरानावर तर सर्वात महत्त्वाची म्हणजे पाणी या रोपांना पाणी पुरवठा करण्यासाठी दोन ते तीन किमी अंतरावर असलेल्या भाटेगाव तलावातून पाईपलाईन द्वारे पाणी आणण्यात आले व येथील संपूर्ण झाडांना ठिबक सिंचनद्वारे पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली त्यासाठी नेटाफीम कंपनीचे ठिबक संच बसविण्यात आले व तिथे नैसर्गिक रित्या वाढलेल्या पळस,  हिवर,मेडशिंगी या  १५०० झाडांचे संगोपन देखील शास्त्रीय पद्धतीने करण्यात आले.

या नऊ ते दहा हजार  झाडांना रासायनिक खतांची मात्रा देखील ठिबकद्वारे दिली जाते  व वेळोवेळी कीडनाशकांच्या  व  झाडाना लागणाऱ्या आवश्यक रसायनांची फवारणी देखील केले जात आहे. वनविभागाच्या या स्तुत्य उपक्रमा मुळे सात हेक्टर क्षेत्रावरील झाडे उत्तमरीत्या वाढली असून  ही झाडे दोन ते तीन वर्षाचे असल्याचे वाटत  आहे. येथील वूक्ष लागवडीवर  वनपरिक्षेत्र वनाधिकारी  व्ही. बी. टाक यांचे विशेष लक्ष असून वनरक्षक माधव केंद्रे व येथील कर्मचारी बालाजी कदम हे विशेष मेहनत घेत आहे. ही वनराई पाहून परिसरातील वनप्रेमी तर्फे वन विभागाचे  अभिनंदन केले जात असुन समाधान व्यक्त होत आहे.  

हिंगोली ते नांदेड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भाटेगाव येथे माळरानावर सात हेक्टरवर ७७७७ झाडांची लागवड केली आहे. योग्य नियोजनामुळे झाडे जोपासली गेल्याने माळरान हिरवळीने नटले आहे.

- विश्वनाथ टाक ( वनपरिक्षेत्र अधिकारी)

 

संपादन - प्रल्हाद कांबळे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: The forest department has created a paradise on a rocky orchard hingoli news