esakal | हिंगोली : चार शेतकऱ्यांच्या नावे परस्पर साडेचार लाख उचलून फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम न्यूज

हिंगोली : चार शेतकऱ्यांच्या नावे परस्पर साडेचार लाख उचलून फसवणूक

sakal_logo
By
विठ्ठल देशमुख

सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : येथील स्टेट बँक आँफ इंडिया शाखेत तालुक्यातील जामदया येथील चार शेतकऱ्यांच्या नावे खोटे दस्तऐवज तयार करुन पिक कर्ज मंजूर करुन चार लाख ६९ हजार रुपायाची रक्कम उचलून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर सेनगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेनगाव येथील बँक आँफ इंडिया शाखेत तालुक्यातील जामदया येथील चार शेतकऱ्यांच्या नावे खोटे दस्तावेज तयार करुन चार लाख ६९ हजार रुपयाची रक्कम परस्पर उचलून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन सेनगाव पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील स्टेट बँक इंडिया शाखेत चार शेतकऱ्यांचा नावे परस्पर पिक कर्ज प्रस्ताव तयार करुन कर्जाची रक्कम हडप केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भिती निर्माण होत आहे.

हेही वाचा - शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची कार पेटवून देण्याचा प्रयत्न

तालुक्यातील जामदया येथील शेतकरी अर्जुन डाखोरे यांच्या नावे अज्ञात आरोपीने तत्कालीन शाखा अधिकारी, बँक कर्मचाऱ्यांसोबत संगणमत करुन १८ ऑगस्ट २०१६ ला खोटे दस्तऐवज तयार करुन एक लाख ९९ हजार तर त्यांचा मुलाचा नावे ता. २५ ऑगस्ट २०१६ ला ९० हजार तर गावातीलच अन्य दोन साक्षीदार यांच्या नावे ता. ३० सप्टेंबर २०१६ प्रत्येकी ९० हजार असे एकुण चार लाख ६९ हजार रुपायाची रक्कम परस्पर उचलून हडप केली आहे. संबधित शेतकरी कधीच बँकेत पिक कर्ज मागणीसाठी आले नसताना हा प्रकार घडल्यामुळे या शेतकऱ्यांनी पोलिस ठाणे गाठून फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे