हिंगोली : एक्स्प्रेस रेल्वेचे आता जनरल तिकीट मिळणार

मुख्य एक्स्प्रेस रेल्वेतील जनरल डबे आरक्षण मुक्त करण्यात आले नव्हते.
हिंगोली
हिंगोली sakal
Updated on

हिंगोली : कोरोनाचा प्रार्दुभाव ओसरला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने स्पेशल रेल्वेंना नियमित रेल्वेचा दर्जा आला. परंतु, मुख्य एक्स्प्रेस रेल्वेतील जनरल डबे आरक्षण मुक्त करण्यात आले नव्हते. त्यामुळे सर्वसाधारण प्रवासी त्रस्त होते. आता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्टेशनवर एक जूनपासून जनरल डब्यासाठी पुन्हा तिकीट विक्रीची सुविधा सुरू केली आहे. यामुळे प्रवाशातून समाधान मानले जात आहे.

हिंगोली रेल्वे स्टेशन येथील दोन्ही स्वयंचलित तिकीट विक्री मशीनद्वारे ऑपरेटरच्या सहाय्याने तिकीट विक्री सुरू करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे स्टेशन मास्टर रामसिंग मीना यांनी दिली. दरम्यान, हिंगोली रेल्वे स्थानकावरून नांदेड तिकीट दर ५५ रुपये, अकोला ६० रुपये, अमरावती ८५ रुपये, नागपूर १३०, पंढरपूर १५५, हैदराबाद १३५ रुपये तसेच हिंगोली येथून सुपरफास्ट रेल्वेसाठी जनरल तिकिटाची किमत पुढील प्रमाणे हैदराबाद १६०, तिरुपती ३१५ रुपये प्रवास भाडे आकारण्यात येत आहे. एक्स्प्रेस रेल्वेत जनरल कोचसाठी जनरल तिकीट विक्री परत सुरू केल्याबद्दल प्रवासी संघटनेचे अध्यक्ष धरमचंद बडेरा, जेठानंद नेनवाणी, चंद्रशेखर नीलावार, गणेश साहू आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com