Hingoli : गोपीनाथराव मुंडे व्याख्यानमालेचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp Gopinath Munde

Hingoli : गोपीनाथराव मुंडे व्याख्यानमालेचे उद्‍घाटन

हिंगोली : येथील शिवाजीराव देशमुख सभागृह येथे राष्ट्रीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानातर्फे तीनदिवसीय व्याख्यानमालेचे उद्‍घाटन सोमवारी (ता. १२) झाले. व्याख्यान मालेचे पहिले पुष्प यशवंत गोसावी यांनी गुंफले

यावेळी व्याख्यानमालेचे स्वागताध्यक्ष आमदार संतोष बांगर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, तात्याराव कराड, आत्माराम बोंदरे, भाजप जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, शिवसेना युवा जिल्हाप्रमुख राम कदम उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्री संत भगवान बाबा व गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.

व्याख्याते गोसावी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विचारातील समतेची उजळणी केली. विविध उदाहरणे, दाखले दिले. आमदार बांगर म्हणाले, कोणत्याही महापुरुषाला कोणत्याही समाजाने जातीच्या बंधनात बांधू नये, सर्वांनी महापुरुषांचे विचार अमलात आणावेत. ज्यामुळे विचार प्रगल्भ होतील, असे ते म्हणाले. सुधीर वाघ यांनी प्रास्ताविक केले. मुरलीधर जायभाये यांनी सूत्रसंचालन केले. संजय फड यांनी आभार मानले.