esakal | हिंगोली : बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तीची आरोग्य तपासणी बंदच
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मार्च महिन्यात राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात कोरोना प्रदुर्भाव वाढल्याने मार्च पासून ते सप्टेंबर या सात महिन्याच्या काळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पर प्रांतातून किंवा बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची नोंद ठेवून त्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या होत्या.

हिंगोली : बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तीची आरोग्य तपासणी बंदच

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात बाहेर राज्यातून किंवा बाहेर जिल्ह्यातून नागरिक खुलेआम येत असताना त्यांची पूर्वी प्रमाणे गावपातळीवरील आरोग्य तपासणी होणे गरजेचे असताना आरोग्य यंत्रणेकडून तपासणी करणे आता बंद केल्याने नागरिक हि बाहेर जिल्ह्यातून येत आहेत, याची आकडेवारी देखील आरोग्य यंत्रणेकडे नसल्याने पुन्हा कोरोना संसर्ग रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मार्च महिन्यात राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात कोरोना प्रदुर्भाव वाढल्याने मार्च पासून ते सप्टेंबर या सात महिन्याच्या काळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पर प्रांतातून किंवा बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची नोंद ठेवून त्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या होत्या. त्यानुसार आरोग्य यंत्रणेने ज्या गावात बाहेरून रुग्ण आला त्याची तपासणी केली जात असे यात पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्यास कोविड सेंटर मध्ये दाखल केले जात होते, तसेच त्याच्या सह परिसरातील नागरिकांची अँटीजन टेस्ट किंवा आरटिपीसीआर तपासणी करून तो परिसर किंवा गावाची सीमा बंद केल्याने नागरिकांना प्रवेश दिला जात नव्हता.तो झोन कन्टेन्टमेन्ट झोन म्हणून ओळखत होता.

हेही वाचा हिंगोली : कुपटी येथील सीआरपीएफ जवानाचा ह्रदयविकाराने मृत्यू

जिल्ह्यात मागील सात ते आठ महिन्यात चार पेक्षा अधिक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते, त्यांच्यावर कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार सुरु केल्यानंतर त्यातून आजघडीला साडे तीन हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर ५३ रुग्णांचा आतापर्यन्त मृत्यू झाला आहे.आता केवळ ४१ रुग्णावर उपचार सुरु आहेत. कोरोना रुग्णाचा मृत्यू दर राज्यात हिंगोलीचा कमी आहे.मात्र आजघडीला जिल्ह्यात दोनचार रुग्ण दर दिवशी आढळून येत आहेत. मागच्या आठवड्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

नांदेड, बीड, लातूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत असताना, तसेच  औरंगाबाद येथे इंग्लंड वरून येणाऱ्या नागरिकाला कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने त्यास क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा आजघडीला बाहेरून येणाऱ्या नागरिकांची नोंद तर सोडाच साधी आकडेवारी देखील नाही. कारण सप्टेंबर पासून लॉकडाऊन मध्ये शिथिलता दिल्याने बस, रेल्वेसेवा सुरु झाली त्यामुळे नागरिक बिनधास्तपणे बाहेर राज्यात, किंवा पर जिल्ह्यात जाऊन येत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण आढळून येण्याची श्यक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे पूर्वी बाहेरून येणाऱ्या नागरिकांची नोंद घेऊन त्याची तपासणी केली जात होती. परंतू आता मागील दोन महिन्यापासून नागरिक बिनधास्तपणे फिरून येत असताना त्यांची नोंद तर आरोग्य यंत्रणेकडे नाहीच शिवाय तपासणी देखील बंद केली आहे. त्यामुळे पुन्हा रुग्ण संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मागील महिन्यात आठवी ते दहावी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रारंभी शिक्षकांची अँटीजन, आरटीपीसीआर टेस्ट केली असता शेकडो शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आल्याने शाळा उघडणे लांबणीवर पडल्या. अद्याप हि काही शिक्षकांचा अहवाल प्रलंबित आहे. याशिवाय कोरोनाची भीती नागरिकांतून गेल्याने नागरिक हि मास्क न लावता ,सँनिटायझरचा वापर न करता, सोशल डिस्टन्स न पाळता बाजारपेठेत गर्दी करीत असल्याचे चित्र डोळ्यासमोर असताना शहर वाहतूक, पालिकेचे कर्मचारी पाच सहा दिवस मोहीम राबवून मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला. आता ही मोहीम बंद केल्याने पुन्हा नागरिक बिनधास्तपणे मास्क न लावता बाजारात किंवा कार्यालयात वावरत आहेत. इतर राज्यातून हिंगोलीत दाखल झाले तरी देखील आरोग्य यंत्रणेला याचे सोयर सुतक नाही . त्यासाठी आरोग्य विभागाने कोरोना गेला म्हणून शांत न बसता पूर्वी सारखी खबरदारी घेणे गरजेचे आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करणे गरजेचे आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image