Hingoli News: गाड्यांवरील बर्फाचा गोळा नको रे बाबा!; अशुद्धतेमुळे घशासह मुलांना पोटाचे विकार, रुग्णसंख्येत वाढ

Health Issues in Children from Unsafe Ice: हिंगोलीत रस्त्यावरील बर्फाचे गोळे मुलांसह नागरिकांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. अशुद्ध बर्फ, घसा दुखणे आणि पोटाचे विकार यासाठी डॉक्टरांनी सावधगिरीचा सल्ला दिला आहे.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

हिंगोली: उन्हाचा कडाका वाढला, की रस्त्यावरील बर्फाच्या गोळ्यांच्या गाड्यांवर गर्दी वाढू लागते. मात्र, हा थंडावा तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. याचा परिणाम म्‍हणून गेल्या काही दिवसांपासून विविध रुग्णालयांमध्ये लहान मुलांची गर्दी होताना दिसत आहे. त्‍यामुळे सर्वप्रथम बाहेरील थंड पदार्थ विशेषत: बर्फमिश्रित पदार्थ खाणे टाळण्‍याचा सल्‍ला डॉक्‍टरांकडून दिला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com