हिंगोली : बियाणे, खतांच्या किमतीतही वाढ

खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
Hingoli inflation seeds and fertilizer prices Rise in kharif season
Hingoli inflation seeds and fertilizer prices Rise in kharif seasonesakal

हिंगोली : यावर्षी पावसाचे लवकर आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सद्या अधून-मधून पावसाच्या हलक्या सरी देखील कोसळत असल्याने खरीप हंगाम जवळ आल्याची चाहूल लागली आहे. कृषी केंद्र चालकांनी खते, बियाणे, तणनाशके विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. मात्र त्याचे भाव यंदा दीड पट्टीने वाढले आहेत.

यावर्षी वेळेवर पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांना खरीप पूर्व कामे सुरू केली आहेत. अनेकांचीही कामे आटोपली असल्याने आता शेतकऱ्यांची पावले कृषी केंद्राकडे वळली आहेत. वेळेवर पाऊस पडला तर दाळवर्गीय पिकाची पेरणी होते, असे शेतकरी सांगतात. दाळवर्गीय पिकात मूग, उडीद या पिकाचा समावेश अधिक असतो. यामुळे मृग नक्षत्रात पेरणी व्हावी, याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक असतो.

यावर्षी जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात ढगाळ वातावरण, मेघगर्जना व कुठे हलका तर कुठे मध्यम पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामातील पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. यावर्षी मात्र खते, बियाणे, तणनाशके यांच्या किमती चांगल्याच वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. मात्र, खते, बियाण्यांच्या किमती वाढत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

खतांची झालेली भाववाढ (गोणी)

खते गतवर्षी यंदा

डीएपी १,२०० १,३५०

१०:२६:२६ १,२२० १,४७०

२०:२०:१३ ९८० १,४७०,

पोटॅश १,०५० १,७५०

सुपर दाणेदार ३०० ४५०

युरिया २६६ २६६

१५:१५:१५ १,१५० १,४७०

बियाणांत झालेली भाववाढ

बियाणे गतवर्षी यंदा

ईगलचे सोयाबीन ३२५० ३८००

अंकुर सोयाबीन ३५५० ४२००

केडीएम सोयाबीन(७२६)३२०० ४०००

उरीरमा सोयाबीन ३६०० ४४००

तणनाशक दरवाढ

तणनाशक गतवर्षी यंदा

राऊंडअप ४५० ६००

टुमीनारा ५५० ७००

मीरा ७१ ९० १२०

दरवर्षी शेतकऱ्यांजवळ शेतमाल आला की, किमती घसरतात. मात्र, पेरण्या जवळ आल्या की, खते, बियाणे यांच्या दरात वाढ होते. हे गणित शेतकऱ्यांसाठी चुकीचे ठरत आहे. शेतमालाला योग्य भाव मिळावा, अशी अपेक्षा काबाडकष्ट करणारे शेतकरी करतात. मात्र, याकडे दुर्लक्ष होते. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

- उत्तमराव शेळके, शेतकरी

आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या वाढीचा हा परिणाम आहे. मात्र, शासनाने मदत जाहीर केल्याने यापेक्षा जास्तीची होणारी भाववाढ थांबण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांनी एकाच खतांची मागणी न करता उपलब्ध असलेल्या खताचा वापर करून सहकार्य केले पाहिजे तसेच काही प्रमाणात रासायनिक खते कमी करून जैविक खतांचा देखील वापर करावा.

-आनंद निलावार, जिल्हाध्यक्ष, खत विक्रेते संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com