Hingoli : ईसापुर चे 9 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

isapur dam

Hingoli : ईसापुर चे 9 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग

कळमनुरी : ईसापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पाऊस व पाणलोट क्षेत्रा अंतर्गत असलेल्या प्रकल्प पेनटाकळी व जयपूर बंधाऱ्यामधून करण्यात येत असलेला विसर्ग पाहता शुक्रवार ता. पाच धरणाचे नऊ दरवाजे ५० सेंटिमीटरने उघडून १४६१५ क्युसेक पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात आला आहे.

ईसापुर धरणाच्या मंजूर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्याकरिता प्रकल्प प्रशासनाने गुरुवार ता. चार सायंकाळी धरणाचे सुरुवातीला दोन व नंतर एक असे एकूण तीन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात आला होता मात्र त्यानंतर रात्रीला ईसापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस व काही भागात अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचे आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्या गेली त्यामुळे धरणात येणारे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गुरुवारी रात्री सुरू असलेल्या तीन दरवाजा मध्ये शुक्रवारी सकाळी वाढ करण्यात आली धरणाचे नऊ दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडून नदीपात्रात १४६१५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे सद्यस्थितीत ईसापुर धरणा ची पाणी पातळी ४४०.३७ मीटर असून एकूण पाणीसाठा १२१९.३५ दलघमी एवढा आहे तर उपयुक्त पाणीसाठा ९०४.३९ दलघमी असून धरणामध्ये ९३.८१ टक्के पाणीसाठा आहे.

धरणाच्या मंजूर जलाशय प्रचलन आराखड्याप्रमाणे १५ ऑगस्ट पर्यंत धरणांमधील पाण्याची टक्केवारी कायम ठेवून धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पाऊस व धरणाच्या पाणलोट क्षेत्रांतर्गत असलेल्या पेनटाकळी प्रकल्प व जयपूर बंधाऱ्यामधून करण्यात येत असलेल्या विसर्ग पाहता ईसापुर धरणाची पाणी पातळी कायम ठेवून पाण्याचा विसर्ग कमी अधिक करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Hingoli Isapur Dam Release Water

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..