

Hingoli Cotton Cultivation
esakal
हिंगोली: रेशीम संचालनालय, नागपूर अंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालय, हिंगोली यांच्यामार्फत जिल्ह्यात ता. ४ फेब्रुवारीपासून महारेशीम अभियान राबविण्यात येत असून या अभियानास जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाची सुरवात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते रेशीम रथास हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.