हिंगोली : स्थानिक गुन्हे शाखेच्या खूर्चीसाठी अनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग

file photo
file photo

हिंगोली : येथील स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांची नांदेड येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त पदावर रुजू होण्यासाठी अनेक पोलिस निरीक्षक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.

जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे खांदेपालटाला लवकरच सुरुवात होणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांची नांदेडला बदली झाल्याने या पदाकरीता अनेकांनी चढाओढ सुरू केली असून त्यासाठी राजकीय वशिलेबाजी देखील होत असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी जिल्ह्याचे सुत्र सांभाळल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या दिलेल्या निकषानुसार सर्वसाधारण बदल्या केल्याने पोलिस कर्मचाऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बदल्याची प्रक्रिया आटोपल्यानंतर नवरात्र, दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन, ईद - ए - मिलाद असे अन्य काही बंदोबस्ताचे सण आल्याने जिल्हांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांच्या खांदेपालटाची प्रक्रिया काहीशी थांबली होती. ता. ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्याना पाचव्यांदा मुदतवाढ मिळाली होती. 

नांदेड परीक्षेत्रासह अनेक ठिकाणच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या . हिंगोली जिल्हा पोलिस दलातील महत्त्वाची शाखा असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक जगदीश मंडरवार यांची नुकतीच नांदेडला बदली झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक जवळपास पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करणारे एकमेव अधिकारी आहेत.

त्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण पोलिस ठाणे, शहर पोलिस ठाणे येथे कामगिरी बजावली आहे. तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांची मागील दोन वर्षांपूर्वी बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागी जगदीश भंडरवार यांच्याकडे हा पदभार सोपविण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार घेतल्यानंतर अनेक धाडसी कारवाया भंडारवार यांनी केल्याने वाळू माफिया असो की, अवैथ धंदेवाले धास्तावले होते. मात्र श्री.  भंडरवार यांनी मागील सहा ते सात वर्षाच्या काळात त्यांनी हिंगोली पोलिस दलात चमकदार कामगिरी बजावली आहे.

दोन दिवसांपूर्वी नांदेड पोलीस क्षेत्राचे पोलीस  महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी परिक्षेत्रातील पंधरा पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत. यात हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद रिक्त झाल्याने हे पद पदरात पाडून घेण्यासाठी  पाच ते सहा पोलीस निरीक्षकानी गुडघ्याला बासिंग बांधून बसले आहेत. या महत्वाच्या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण जिल्हा वासीयांचे लक्ष लागले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com