
या प्रकरणी रविवारी (ता. २४) दोघाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
हिंगोली : शहरातील तिरुपती नगर येथे एका विवाहितेचा पती व दीराने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रविवारी (ता. २४) दोघाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील तिरुपती नगर येथील किरण पंकज सावंत (वय २१) हिचा पती पंकज बाबाराव सावंत व दीर गोपाल बाबाराव सावंत या दोघांनी संगनमत करून सोमवारी (ता.१८) रात्री साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान शहरातील तिरुपती नगर येथील राहत्या घरी कोणत्या तरी कारणावरून कशाने तरी मारहाण करून कोणत्या तरी वस्तूने किरणचा गळा आवळून खून केला.
या बाबतचा पंचनामा रविवारी प्राप्त झाल्याने पोलिस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात रविवारी पहाटे २.५१ वाजता गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीन देशमुख, पोलिस निरीक्षक श्री. ठाकूर आदींनी भेद दिली आहे.