Hingoli Fire Tragedy : हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; महिला आणि मुलासह दोघांचा मृत्यू, नगर परिषदेचे कर्मचारी गंभीर भाजले!

मारवाडी गल्लीतील रहिवासी भागात ५ घरे भस्मसात; अग्निशमन दलाचा बंबही जळाला, आमदार संतोष बांगरांकडून बचावकार्य
Massive fire at firecracker godown in Hingoli; Woman and child burned to death

Massive fire at firecracker godown in Hingoli; Woman and child burned to death

Sakal

Updated on: 

हिंगोली : हिंगोली शहरातील मारवाडी गल्लीतील दाट रहिवासी वस्तीमध्ये फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत एका महिलेसह लहान मुलाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला असून, आगीत अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेली हिंगोली नगर परिषदेची अग्निशमन गाडीच (बंब) आगीच्या विळख्यात सापडून जळून खाक झाली. यात कर्तव्यावर असलेले हिंगोली नगर परिषदेचे कर्मचारी गंभीररीत्या होरपळले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या महाभीषण दुर्घटनेने संपूर्ण हिंगोली शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com