Hingoli Crime: लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार; औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, पीडिता अल्पवयीन

Hingoli News: हिंगोलीत एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अमोल माहोरे यांनी अत्याचार केला; पीडित मुलगी गर्भवती राहिली. औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.
Hingoli Crime

Hingoli Crime

sakal

Updated on

हिंगोली : औंढा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने अत्याचार केले. दरम्यान, या अत्याचारामुळे ती गर्भवती राहिली. या प्रकरणी संबंधित तरुणावर बुधवारी (ता. १८) गुन्हा नोंद झाला आहे. तरुणाच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com