esakal | हिंगोली : नऊ वर्षीय मुलीच्या हत्येचा गुंता सुटेना, अखेर पोलिस प्रशासनाने खुनाची माहिती देणाऱ्यास पन्नास हजाराचे पारितोषिक 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

प्रकरणातील खुनाचा अद्याप गुंता सुटत नसल्याने अखेर बाळापुर पोलिसांच्या वतीने खुनाची माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

हिंगोली : नऊ वर्षीय मुलीच्या हत्येचा गुंता सुटेना, अखेर पोलिस प्रशासनाने खुनाची माहिती देणाऱ्यास पन्नास हजाराचे पारितोषिक 

sakal_logo
By
सय्यद अतिक

आखाडा बाळापूर ( जिल्हा हिंगोली ) : राजस्थान राज्यातील काही कुटुंबीय उदरनिर्वाहाच्या निमित्ताने बाळापुर परिसरामध्ये वास्तव्यास आले होते. त्या कुटुंबियातील एका नऊ वर्षीय मुलीची गत महिन्यात हत्या करून विहिरीत टाकले होते या प्रकरणातील खुनाचा अद्याप गुंता सुटत नसल्याने अखेर बाळापुर पोलिसांच्या वतीने खुनाची माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की आखाडा बाळापुरपासून जवळ असलेल्या कामठा फाटा शिवारामध्ये राजस्थान राज्यातील टोक जिल्ह्यातील बारामुल्ला या गावात तील काही कुटुंबीय उदरनिर्वाहाच्या निमित्ताने येथे आले होते लोकांचे मनोरंजन करून त्यावर उपजीविका करणाऱ्या कुटुंबियातील रेश्मा गुड्डू शहा या नऊ वर्षीय मुलीचा मागील महिन्यात डोक्यावर जबर मारहाण खून करून  तिचे प्रेत विहिरीत टाकण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास स्वतः पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीन देशमुख, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, कळमनुरीचे पोलीस निरीक्षक रणजित भोईटे, सहाय्यक श्रीनिवास रोयलावार, बाळापूरचे सहाय्यक पोलिस रवी हुंडेकर, अच्युत मुपडे यांच्या पथकाने केला  होता.

या खून प्रकरणाचा गुंता सुटत नसल्याने व या खुनाचा छडा लावण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने तपास केला गेला ज्यामध्ये या कुटुंबियातील दोन तरुण मयत मुलीचा खून झाल्यानंतर गायब झाले होते. त्यांनाही मध्यप्रदेश राज्यातून संशयित म्हणून अटक करण्यात आले होते. परंतु त्या दोघांकडूनही समाधानकारक माहिती मिळत नसल्याने शेवटी भाकड बाळापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकरी यांनी या कुणाची योग्य माहिती देणाऱ्यास पन्नास हजाराचे पारितोषिक जाहीर केले आहे. खूनाला एक महिन्याच्या वर होऊनही याचा तपास लागत नसल्याने शेवटी हा निर्णय घेण्यात आले असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image